Latestnews

शिवस्मारकाच्या भाजपा नितीवर विनायक मेटे नाराज, प्रेक्षकात बसणार!

2016-12-23 20:48:09 6285 Views 0 Comments

मुंबई: उद्या पंतप्रधानांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात भाजपाने वापरलेल्या नितीवर शिवसेनेसह विनायक मेटेही नाराज झाले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भाजपाचा हा सारा खटाटोप सुरु आहे. असं मेटे सांगतात. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुंबईत शोभायात्रा काढण्यात आली. सर्व जिल्ह्यातील नद्यांचे पाणी आणि मातीचे कलश या यात्रेत ठेवण्यात आले होते. ही शोभायात्रा म्हणजे भाजपाचे शक्तीप्रदर्शन आहे असा आरोप करीत मेटे यांनी ही यात्रा अर्ध्यातच सोडून दिली. शिवसेनेसह इतर घटक पक्षांचाही या यात्रेत सहभाग हवा होता, या एकुणच प्रकरणावर नाराज असलो तरी शिवस्मारकाच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहोत, असे मेटे सांगतात. यासाठी प्रेक्षकात बसावे लागले तरी मेटे तयार आहेत. दरम्यान शिवस्मारकाच्या जागेला विरोध करणार्‍या कोळी बांधवांनी मोटारसायकल रॅली काढली, या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांची रवानगी मुंबईबाहेर करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी