Latestnews

अखिलेश यादवांना मुलायमसिंगांनी केले मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार!

2016-12-30 20:31:26 4796 Views 0 Comments

लखनौ: समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या निवडीवरुन होत असलेले राजकारण आज मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे निकटवर्तीय रामगोपाल यादव यांचा बळी घेऊन गेले. मुलायमसिंग यादव यांनी या दोघांनाही सहा वर्षांसाठी पक्षासाठी निलंबित केले. आपल्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, पक्ष वाचवण्याला आपण प्राधान्य देतो असं मुलायमसिंग यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी निवडणुकीतील उमेदवारांच्या याद्या या यादवीला कारणीभूत ठरल्या. मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांनी उमेदवारंच्या तीन वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्याने संघर्षाची ठिणगे पडली. तिघांनीही एकमेकांच्या यादीतील उमेदवारांची काही नावे कापल्याने संघर्ष सुरु झाला. पक्षविघातक कारवाया केल्याचा ठपका ठेवत मुलायमसिंग यादव यांनी अखिलेश यादव आणि रामगोपाल याद्व यांना पक्षाबाहेर काढले. आपणावर करण्यात आलेली कारवाई घटनात्मक तत्वांना धरुन नाही असं दोन्ही यादवांचं म्हणणं आहे. पुढचा मुख्यमंत्री आपणच ठरवू असं मुलायमसिंग यादव सांगतात.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी