Latestnews

उद्यापासून एटीएममधून काढा दररोज साडेचार हजार

2016-12-31 12:37:58 4888 Views 0 Comments

नवी दिल्ली: बॅंकातून पैसे काढण्यावर आलेल्या निर्बंधामुळे सगळेच अडचणीत आले होते. आता थोडा दिलासा मिळाला आहे. उद्या एक जानेवारी २०१७ पासून एटीएममधून दररोज साडेचार हजार रुपये काढता येतील. आठवड्याची मर्यादा २४ हजार रुपये इतकी आहे. पूर्वी एटीएममधून दररोज केवळ अडीच हजार रुपये काढता यायचे. लोकांची अडचण होऊ नये यासाठी पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
नोटाबंदी झाल्यानंतर सात दिवस नेमकं काय होतंय हे कळालं नाही. मोठ्या प्रमाणावर काळा पैसा समोर येईल असं सांगण्यात आलं होतं. तसं फारसं काही होताना दिसलं नाही, नोटाबंदी म्हणजे डोंगर उकरुन उंदीर शोधण्यासारखं आहे अशी टीका विरोधक करीत आह्ते. ही टीका मोदी यांनी स्विकारली आहे. होय आम्हाला डोंगर पोखरुन उंदीरच शोधायचा होता. हा उंदीरच मोठं नुकसान-नासाडी करतात असं पंतप्रधान सांगतात. नोटाबंदीवेळी पंतप्रधानांनी जनतेला पन्नास दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानंतर प्रगती न दिसल्यास काहीही शिक्षा द्या असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज राष्ट्राला उद्देशून बोलणार आहेत. आज त्यांच्याकडून अनेक लोकप्रिय योजना जाहीर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी