Latestnews

नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेसचे तीन टप्प्यात आंदोलन

2016-12-31 20:17:09 6597 Views 0 Comments

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष तीन टप्प्यात आंदोलन करणार आहे. एक ते १० जानेवारी, ११ ते २० जानेवारी आणि २१ ते ३० जानेवारी असे या आंदोलनाचे तीन टप्पे असतील. नोटाबंदी हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. ०८ नोव्हेंबर रोजी ओदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे देशभर चलन तुटवडा निर्माण झाला. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नोटाबंदीमुळे संसदेचेही कामकाज होऊ शकले नाही. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत आपली भूमिकाही सांगितली नाही. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यालाही उत्तर मिळाले नाही. मोदी यांनी नोटाबंदीनंतर ५० दिवसांचा अवधी मागितला होता. याचे योग्य परिणाम न दिसल्यास हवी ती शिक्षा देण्याची भूमिका जाहीर केली होती. दरम्यान नरेंद्र मोदी गर्विष्ठ आहेत अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बॅंकांच्या रांगेत मरण पावलेल्यांना मोदीच जबाबदार आहेत असं सांगत ममता यांनी या मृत नागरिकांची यादीच जाहीर केली.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी