Latestnews

बीएसएनएलची १४४ रुपयात कुठल्याही नेटवर्कवर अमर्याद कॉलिंग

2017-01-01 15:28:36 7979 Views 0 Comments

नवी दिल्ली: रिलायन्स आक्रमकपणे बाजारात उतरल्यानंतर सगळ्याच कंपन्यांचे ‘उंट पहाड के निचे आ गये!’ मोबाईल कंपन्या रोजच नवनव्या ऑफर्स देत आहेत. सगळ्यांनीच इंटरनेट डेटाचे दर कमी केले. त्याला उत्तर म्हणून रिलायन्सने घरपोच मोफत सीमकार्ड पोचवण्याची व्यवस्था केली. आता सगळीकडेच जिओचा बोलबाला असल्याने ग्राहक टिकवणे याला सगळ्या कंपन्या प्राधान्य देत आहेत. अलिकडेच बीएसएनएलने ३२९ रुपयात एक जीबी डेटा आणि एक महिनाभर अमर्याद कॉलिंग फ्रीचा फंडा बाजारात आणला. आता याच बीएसएनएलने १४४ रुपयांचा नवा पॅक बाजारात आणला आहे. १४४ रुपयात कुठल्याही नेटवर्कवर स्थानिक आणि एसटीडी कॉल्स अमर्याद काळासाठी मोफत करता येतील. ही योजना प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी आहे. बीएसएनएलचे प्रबंधक निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १४४ रुपयात मोफत कॉल्स आणि ३०० एमबीचा डेटाही मिळणार आहे. बीएसएनएलने आजवर ४४०० हॉटस्पॉट सुरु केले आहेत. आगामी काळात ही संख्या ४० हजारांवर नेली जाणार आहे. जिओला टक्कर देण्यासाठी सगळ्याच कंपन्यांनी कंबर कसली आहे. यात आघाडीच्या सगळ्या कंपन्यांचा समावेश आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी