Latestnews

शिक्षक मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी दक्षता घ्या- आयुक्त

2017-01-06 19:14:00 6741 Views 0 Comments

औरंगाबाद: भारत निवडणूक आयोगाने बुधवार, ०४ जानेवारी रोजी औरंगाबाद विभागाच्या शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षक मतदारांवर कोणत्याही प्रभाव पडणार नाही यासाठी सर्वांनी निवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले.
विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त महेंद्र हारपाळकर आदींसह निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. भापकर म्हणाले मंगळवार १० जानेवारी रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे. मंगळवार १७ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक आहे. दिनांक १८ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. दिनांक २० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी मतदान सकाळी ०८ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत होईल. ०६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल तर दिनांक ०९ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी