Latestnews

शेतकर्‍यांना आजपासून मिळणार १० हजार, बॅंका मात्र नाराज

2017-06-15 17:48:34 1109 Views 0 Comments

मुंबई: शेतकर्‍यांना पेरणीसाठी तातडीने १० हजार रुपये कर्जापोटी उचल देण्याचा शासन निर्णय बुधवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आला पण बॅंकांनी त्याला आक्षेप घेतला आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांना अशा प्रकारे कर्जाची उचल देणे हा नियमातला अपवाद तयार करण्यास बॅंका तयार नाहीत. राज्य सरकारच्या धोरणानुसार आज गुरुवारपासूनच दहा हजार रुपयांची उचल शेतकर्‍यांना वितरीत केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा बॅंका आणि व्यापारी बॅंकांना देण्यात आले आहेत. या दहा हजार रुपयांसाठी शेतकर्‍यांचे नवे खाते उघडले जाणार आहे. सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील, आजी-माजी खासदार, आमदार, सूतगिरणी, साखर कारखान्यांचे संचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य यांना याचा लाभ मिळणार नाही. हे कर्ज घेताना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. तसे शपथपत्र लाभार्थ्यांकडून भरुन घेतले जाणार आहे. दहा हजार रुपयांची उचल आता लगेचच द्यावी आणि नंतर मंजूर झालेल्या पीक कर्जातून ती वळती करुन घ्यावी अशी संकल्पना आहे. पण शेतकर्‍यांच्या या कर्जाची हमी कोण घेणार असा बॅंकांचा प्रश्न आहे. त्याची हमी सरकार घेईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी