Latestnews

वीजचोरी प्रकरणी एक वर्ष कारावास, १६ हजारांचा दंड

2017-06-16 17:05:26 1238 Views 0 Comments

मुंबई: वीजचोरी प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील विनायक निंबा पवार यास शहादा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष कारावास व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. नंदुरबार येथील महावितरणचे भरारी पथक तपासणी करीत असताना त्यांना शहादा येथील विनायक निंबा पवारच्या वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून भरारी पथकाचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता बीएस तायडे यांनी पवारविरुध्द विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ (१) (ब) नुसार महावितरणच्या नाशिक पोलिस टःआण्यामध्ये गुन्हा दाखल केला. डिसेंबर २०११ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी विनायक पवारने वीजचोरी केल्याचे सिध्द झाल्याने त्यास शहादा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष कारावस व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी