Latestnews

बाबरीचा बदला ९३ चे साखळी स्फोट, सहा दोषी, एक सुटला

2017-06-16 21:16:21 1264 Views 0 Comments

मुंबई: बाबरी मशिदीच्या पतनाचा बदला म्हणून १९९३ साली मुंबईत घडवल्या गेलेल्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणी सहा जण दोषी ठरले आहेत. एका आरोपीला पुराव्या अभावी सोडून देण्यात आले. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता. ७१३ जण गंभीर जखमी झाले होते. तर जवळपास ३० कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. या प्रकरणात टाडा न्यायालयात अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेखला दोषी ठरले. कट आणि हत्या केल्याचा दोष न्यायालयाने ठेवला. अब्दुल्ल कय्यूम हा आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटला आहे.
१२ मार्च १९९३ साली मुंबईत हे साखळी स्फोट घडवले गेले. यासाठी सुमारे तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून भारतात आणले गेले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याकूब मेमनला या आधीच फासावर लटकवण्यात आले आहे.
आज दोषी ठरलेल्या अबू सालेमला पोर्तुगालातून प्रत्यार्पण कायद्याने भारतात आणले आहे. त्याला फाशी द्यायची नाही या अटीवर पोर्तुगालने त्याला भारताच्या हवाली केले. दाऊद इब्राहीमसह आणखी २७ आरोपी अद्याप फरार आहेत. दोषी ठरलेल्या या आरोपींना काय शिक्षा द्यायची याबद्दलचा युक्तीवाद १९ जूनपासून सुरु होणार आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी