Latestnews

अमित शाह यांच्या ठाकरे भेटीवर मध्यावधीचे भवितव्य!

2017-06-16 21:29:51 1682 Views 0 Comments

मुंबई: भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आज तीन दिवसांसाठी मुंबईत दाखल झाले. उद्या ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या भेटीला अनेक मुद्द्यांवर महत्वाचे मानले जात आहे. येऊ घातलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक, शेतकरी कर्जमाफी आणि मध्यावधीच्या चर्चा या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. नैसर्गिक मित्र म्हणवणार्‍या भाजप आणि शिवसेनेत अलीकडे फारसे जमत नाही. आम्ही बैठकीत साथ साथ असतो. नंतर मात्र शिवसेना आम्हाला विचारते हम आप के है कौन असं खरं चित्र अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर मांडलं होत. यावरुन दोन्ही पक्षातली मैत्री काय आहे याचा अंदाज येऊ शकतो. रोज एकमेकांना नावे ठेवल्याशिवाय या दोन्ही पक्षांचा दिवस संपत नाही. यामुळेच की काय एकदा मध्यावधी घेऊन शिवसेनेला बाजुला काढावे असा भाजपाचा बेत असू शकतो. त्यातच पुढच्या महिन्यात राजकीय भूकंप होईल असे संकेत शिवसेनेने दिले होते.
राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्वाची असल्यानेच अमित शाह भेटीसाठी आले असावेत, यासोबत दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. आज मुंबईत आल्या बरोबर अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. ते उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीतून तणाव कमी झाला, सेनेने ऐकले तर मध्यावधीचा विषय बाजुला सारला जाऊ शकतो.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी