Latestnews

उमेदवार कुणीही असेल पाठिंबा देता का?- शाह, आधी उमेदवार सांगा- ठाकरे

2017-06-19 7:26:42 1913 Views 0 Comments

मुंबई: भाजपाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अजून ठरायचा आहे, त्या आधीच अध्यक्ष अमित शाह यांनी मतं जमवायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. घटक पक्षांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार पंतप्रधानांना दिले आहेत असं सांगत शिवसेनेचा पाठिंबा मागितला. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना तोडीस तोड उत्तर दिले, आधी उमेदवार सांगा मग पाठिंब्याचं बघू असं त्यांनी सांगितल्याचं समजतं. सकाळी दहा वाजता सुरु झालेली ही बोलणी सुमारे ७५ मिनिटे चालली. उध्दव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत होते तर शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे होते. मुख्य चर्चेवेळी मात्र राऊत आणि दानवेंना बाहेर बसवल्याचे समजते.
येत्या २३ जूनपर्यंत एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला जाणार आहे. ०१ जुलैपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होईल की मतदान होईल हे निश्चित झाल्यानंतर निवडणूक आयोग मतपत्रिका छापण्याची प्रक्रिया सुरु करेल. १७ जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान आणि २० जुलैला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २३३ सदस्य अशा ७७६ खासदारांसह देशभरातील ४,१२० आमदार मतनाचा हक्क बजावतील.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी