Latestnews

रामनाथ कोविंद, भाजपाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

2017-06-19 15:16:14 1999 Views 0 Comments

नवी दिल्ली: लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, मोहन भागवत, सुषमा स्वराज यांची नावे चर्चेत असताना भाजपाने आज अनपेक्षितरित्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित केले. कोविंद २३ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपाच्या राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. आधी उमेदवार सांगा असं ठाकरे यांनी सुनावलं होतं. शिवसेनेनं मोहन भागवत आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन या दोघांची नावे सुचवली होती.
आज सकाळी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोविंद यांच्या नावावर एकमत झाले. व्यवसायानं विधिज्ञ असलेल्या कोविंद यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही काम केले आहे. मागास समाजातील कोविंद यांनी दोनवेळा राज्यसभेचे सदस्यत्व सांभाळले होते. भाजपाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कोविंद यांची निवड बिनविरोध व्हावी असा भाजपाचा प्रयत्न आहे. कोविंद यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना, कॉंग्रेससह सर्वच पक्षांना कळवण्यात आल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी