Latestnews

उत्तरप्रदेशातील कारागृहात गोशाळा, भटक्या गायींचीही सोय

2017-06-19 17:34:01 2048 Views 0 Comments

लखनौ: उत्तरप्रदेशातील सर्व जिल्हा कारागृहात गोशाला उभारण्याचा निर्णय तिथल्या राज्य सरकारनं घेतला असून या प्रस्तावावर सध्या काम सुरु आहे. राज्याती ल कारागृहात अशा प्रकारचा उपक्रम राबवता येईल का याची माहिती कारागृह राज्यमंत्री जयकुमार सिंग यांनी दिली. या नव्या उपक्रमामुळं गायींना आधार मिळेल, सेंद्रीय शेतीला पूरक काम होईल अशी संकल्पना आहे. गौतम बुद्धनगर येथील कारागृहात अशा पद्धतीचे काम सुरु झाले आहे.
मागच्या वर्षी हरयाणा सरकारने अशाच गोशाला उभारण्याची घोषणा केली होती. अलाहाबादच्या नैनी कारागृहात अनेक वर्षांपासून अशी गोशाला चालू आहे. आमच्याकडील सर्व कारागृहात आवश्यक मनुष्यबळ आणि जागाही आहे. सरकारकडून थोडीफार मदत, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. अशा गोशालात भटक्या गायींनाही सामावून घेतले जाईल. यामुळे कैद्यांनाही नवे काम मिळेल. गायीच्या मलमुत्राचा उपयोग सेंद्रीय शेतीसाठी होईल असे सरकारी सुत्रांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी