Latestnews

कॉंग्रेसचे अहमद पटेल राज्यसभा निवडणुकीत विजयी, भाजपावर मात

2017-08-09 6:33:55 2149 Views 0 Comments

गांधीनगर: गुजरात राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार, सोनिया गांधी यांचे सल्लागार आणि कॉंग्रेसमधील वजनदार नेते अहमद पटेल निकराने विजयी झाले. अर्ध्या मताने झालेला त्यांचा विजय भाजपाला झोंबला आहे. पटेल यांचा हा पाचवा विजय आहे. या निवडणुकीत अमित शाह आणि स्मृती इराणी यांनाही विजय मिळाला. पटेल यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने मोठा जोर लावला होता पण त्याला यश आले नाही.
भाजपा आणि कॉंग्रेसमधील संघर्षामुळे मतमोजणी रात्री दीड वाजता सुरु झाली. या निवडणुकीत पक्ष प्रतिनिधीला दिलेल्या मताची पत्रिका दाखवायची असते. कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या मतपत्रिका अमित शाह यांना दाखवल्याने ही मते बाद करण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती. निवडणूक आयोगाने कॉंग्रेससारखा निर्णय दिला. त्याला भाजपाने आव्हान दिल्याने मतमोजणी पुन्हा लांबणीवर पडली होती. अमित शाह आणि इराणी यांना प्रत्येकी ४६ तर पटेल यांना ४४ मते मिळाली. पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला. ही निवडणूक माझ्या कारकीर्दीतील सर्वात कठीण निवडणूक होती. आजवर एवढे आव्हान कधीच मिळाले नव्हते. मला पराभूत करण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर सत्याचा विजय झाला, सत्यमेव जयते! अशी प्रतिक्रिया अहमद पटेल यांनी दिली.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी