Latestnews

देता की जाता? ऐतिहासिक मोर्चा, आ. आशिष शेलारांना आंदोलकांनी हाकलले!

2017-08-09 13:22:21 2292 Views 0 Comments

मुंबई: आज निघालेल्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाने सगळे विक्रम मोडीत काढले. आझाद मैदान येथे भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना मोर्चेकर्‍यांनी थांबू दिले नाही. त्यांना बाहेर काढले. यावेळी धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे. या पूर्वी मुंबईत निघणारा मोर्चा दोनवेळा शेलारांमुळंच रद्द झाला. ते आमदार अहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सभागृहात जाऊन आपापलं काम करावं, मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावं असं आंदोलक म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. या मागणीसाठी राज्यात आजवर ५७ मराठा मोर्चे निघाले. हा मोर्चा अखेरचा असला तरी आंदोलने थांबणार नाहीत असे सांगण्यात आले. ५७ मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही अतिशय शांततेत निघाला. या मोर्चाला कसलाही राजकीय रंग येऊ द्यायचा नाही, कुणालाही नेतृत्व द्यायचं नाही या धोरणांनी हे मोर्चे झाले. भायखळा येथून सुरु झालेला या मोर्चात राज्याच्या सगळ्या भागातील मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले. मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला. तिथं काही मुलींनी आंदोलकांना संबोधित केलं. यावेळी भाषण करणार्‍या मुलीने ‘देता की जाता?’ असा अखेरचा सवाल केला.
दरम्यान या प्रश्नावरुन विधीमंडळात मोठा गोंधळ झाला. या मोर्चाला विरोधक आणि सत्ताधार्‍यांनीही पाठिंबा दिला. प्रथेनुसार या मोर्चाचे नेतृत्व समाजातील तरुणींनी केलं. मोर्चाच्या अनुषंगाने बाहेरुन येणार्‍या आंदोलकांसाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात व्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चाचे निरोजन सुलभपणे व्हावी यासाठी २५ हजार स्वयंसेवक तीन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी