Latestnews

ज्याचा मोर्चा अधिक मोठा त्याला अधिक फायदा?- आजमी, जलील

09-08-2017 : 06:34:46 2510 Views 0 Comments

मुंबई: विक्रमी मराठा मोर्चा मुंबईत धडकल्यानंतर सरकारला काही निर्णय घेणे भाग पडले. या प्रश्नावर तुर्तास तरी मुख्यमंत्र्यांनी विजय मिळवल्या. मुख्यमंत्र्यांनी अनेक सवलती-घोषणा केल्या. त्यावर विधानसभेत अबू आजमी आणि इम्तियाज जलील मात्र आक्रमक झाले. ज्यांचा मोर्चा अधिक मोठा त्यांना अधिक फायदा देणार का? असा प्रश्न विचारला गेला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मागासवर्गीय आयोगाचा अखत्यारीत आहे, या आयोगाचा अहवाल न्यायालयाकडे सादर झाल्यानंतर आरक्षणाचा निर्णय घेता येईल, छत्रपती शाहू महाराज योजनेनुसार मराठा विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारले जाईल, ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही ६०५ अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती दिली जाईल, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाईल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या. मुख्यमंत्र्यांच्या घोषणांनंतर अबू आजमी उठले. मुस्लीमांच्या आरक्षणाचं काय असा प्रश्न त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देताय त्याबद्दल आभारी आहे. पण मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा दुधातून माशी काढून टाकल्यासारखा का काढून टाकता? असे ते म्हणाले. ज्याचा मोर्चा अधिक मोठा त्यालाचा अधिक फायदा मिळणार का? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी केला. त्यावर मुस्लीम समाजातील ओबीसी आणि एससींना आरक्षण आहे असे उत्तर त्यांनी दिले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी