Latestnews

उर्वरीत पाऊस पडेल दोन महिन्यात, हवामान खात्याचा अंदाज

2017-08-10 12:24:04 3125 Views 0 Comments

पुणे: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उर्वरीत पाऊस पडेल. या पैकी अधिक पाऊस ऑगस्टमध्ये होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. जून महिन्यात उत्तम पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने पाठ दाखवल्याने मराठवाड्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
दरवर्षी प्रमाने मॉन्सूनच्या अंदाजाचा दुसरा टप्पा हवामान खात्याने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार यंदाही पाऊस सरासरी गाठणार आहे. या वर्षी देशात सरासरी इतका पाऊस होईल. यात थोडीफार वाढ होण्याचे भाकित हवामान खात्याने केले आहे. कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी असल्याने इशान्य आणि उत्तर भारतात पाऊस पडतो आहे. यंदा अल निनोचा कसलाही प्रभाव असणार नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल. तो सरासरीपर्यंत पोचेल असं खात्याचं म्हणणं आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी