Latestnews

मराठा मोर्चा: सरकारने करुन घेतली सुटका- आ. अमित देशमुख

2017-08-10 20:27:26 6968 Views 0 Comments

मुंबई (आलानेप्र): लाखोंच्या संख्येने मराठा बांधव राज्याच्या विविध भागातून मुंबईत एकवटले. आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्यावर आता तरी सरकारकडून ठोस निर्णय घेतला जाईल अशी आशा होती, मात्र मराठा समाजाच्या हाताला फारसे काही लागले नाही. तुमच्या सार्‍­या मागण्या मान्य आहेत असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागणार हे मात्र सरकारकडून सफाईदारपणे स्पष्ट करणे टाळले जात आहे. काही जुजबी मागन्या मान्य करुन सरकारने सध्या तरी आपली सुटका करुन घेतली आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचा प्रश्न सध्या अधांतरी ठेवण्यात आला आहे. धनगर आणि लिंगायत समाजाच्या मागणीचीही तीच गत आहे. मातंग समाजासह इतर समाजालाही झुलवत ठेवले जात आहे. आरक्षणाचा हा गंभीर प्रश्न सरकारला फार काळ लोंबकळत ठेवता येणार नाही याची चुणूकही आजच्या मराठा मोर्चाने दाखवून दिली याबद्दल मोर्चेकरी अभिनंदनास पात्र आहेत, असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी