Latestnews

व्यापार, उद्योग, हॉटेल्स राहणार २४ तास उघडी

2017-08-11 7:23:06 7634 Views 0 Comments

मुंबई: हॉटेल्स, दुकाने, मॉल्स रात्रभर उघडी ठेवण्याची तरतूद असणार्‍या विधेयकाला विधानसभेनं मंजुरी दिली आहे. रात्री बेरात्री एखाद्या शहरात आलेल्या व्यक्तीची आता अडचण होणार नाही. शिवाय या निमित्ताने रात्रभर शहरात चहलपहल राहिल्याने आपसुकच सुरक्षितता मिळणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात मुंबईची मोठी सोय असे असले तरी कुठल्या भागातील दुकाने कितीपर्यंत उघडी ठेवायची हे मात्र पोलिसांच्या मनावर असणार आहे. ज्या ठिकाणी महिल काम करतात तिथे पाळणाघर हवे, शिवाय कॅंटीनही असणे आवश्यक आहे. विद्यमान स्थितीत दुकाने रात्री दहापर्यंत बंद करण्याचा नियम आहे. दहापेक्षा कमी कर्मचारी असणार्‍या आस्थापनांना रात्रभर खुले राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही. या निर्णयामुळे व्यापार, व्यवसायाला चालना मिळेल. अशा आस्थापनांवरचा दिवसाचा ताण कमी होईल, होणारी गर्दीही काही प्रमाणात कमी होईल. मुंबईत रात्री उशिरा खरेदी करुन लगेचच गावाकडे परतण्याचीही संधी मिळणार आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी