Latestnews

लातुरच्या शेतकर्‍यांना मिळणार ३४४ कोटी १७ लक्ष- आ. त्र्यंबक भिसे

2017-08-11 12:56:37 9885 Views 0 Comments

मुंबई : लातूर जिल्ह्यात मागच्या ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत ५०४७३० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. अनेक रस्ते व पूल तसेच रेणापूर लातूर व औसा तालुक्यातील शेतजमीन, जनावरे वाहून गेली. नैसर्गिक आपत्तींतर्गत शेतकर्‍यांच्या नुकसानीचा जिल्हाधिकार्‍यांनी शासनाला अहवाल सादर केला होता. शेतकर्‍यांना ३४४ कोटी १७ लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेत आ. त्र्यंबक भिसे यांनी लाऊन धरली. शेतकर्‍यांनाना एक महिन्यात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे यांनी शासनाच्या वतीने दिले.
सप्टेंबर २०१६ च्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील सर्व नद्या नाल्यांना पूर आल्याने ४५४४०७ शेतकऱ्यांची ५०४७३० हेक्टर क्षेत्रावरील संपूर्ण खरीप पिके पाण्याखाली गाढली गेली. राज्य मार्गावरील १४ व प्रमुख जिल्हा मार्गावरील ३४ पुले वाहून गेली. राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील १३०७ किलोमीटर लांबीचे रस्ते खड्डे पडल्याने खराब झाले. जिल्हा परिषद अंतर्गत ७२ गावांच्या जोड रस्त्यांवरील पूल व रस्ते वाहून गेले. ३३९ पाझर तलाव, कोप बंधारे, साठवण तलाव तसेच ७० पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या. बोकनगाव सलगरासह अनेक गावातील बस वाहतूक तेव्हापासून बंद आहे. प्रत्येक विभागाने सदर दुरुस्तीसाठी निधीसह मंजुरीचा प्रस्ताव शासनास सादर केला. त्याला एक वर्ष झाले तरी शासन याबाबत कार्यवाही करीत नाही. आमदार त्र्यंबकनाना भिसे यांनी सतत विधानसभेत व शासनाकडे पाठपुरावा केला परंतु या प्रस्तावना मंजुरी मिळत नसल्याने आ. भिसे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. या लक्षवेधी चर्चेच्यावेळी एक महिन्यात नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन मदत पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी