Latestnews

नव्या महापालिकांना द्या पाच वर्षे अनुदान- आ. अमित देशमुख

2017-08-11 13:18:17 8771 Views 0 Comments

मुंबई : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणखी पाच वर्षे सहायक अनुदान देण्यात यावे अशी मागणी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या या तिन्ही महापालिकांना पाच वर्षांसाठी सहायक अनुदान देण्याचा निर्णय यापुर्वीच राज्य शासनामार्फत घेण्यात आला होता. हा पाच वर्षांचा कालावधी संपल्याने सहायक अनुदानाअभावी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापालिकांकडे निधी नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा या महापालिकांचा प्रयत्न सुरु आहे. महापालिका क्षेत्रातील स्थावर मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करुन उत्पन्नात वाढ करण्यात येणार आहे. मात्र तुर्तास तरी वेतनासाठी निधी नसल्याने आणखी पाच वर्षे सहायक अनुदान द्यावे अशी विनंती आ. अमित देशमुख यांनी एका पत्राद्वारे वित्त मंत्र्यांना केली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी