Latestnews

वीजनिर्मिती कमी, तात्पुरते भारनियमन, दिवाळीत भारनियमन नाही

2017-10-06 21:16:22 1561 Views 0 Comments

कोळशाच्या खाणींमध्ये पाऊस पडल्याने निर्माण झालेले संकट. २००० मेगावॉटची तूट
नागपूर : महानिर्मिती व खाजगी वीज निर्मिती कंपन्यांची वीज निर्मिती कमी झाल्यामुळे भारनियमनाचे तात्पुरते संकट निर्माण निर्माण झाले असून येत्या १५ दिवसात विजेची परिस्थिती सुधारेल. तसेच एससीसीएल कोळसा खाणीत पडलेल्या पावसामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी कमी कोळसा उपलब्ध झाल्यामुळे भारनियमन करावे लागत असून नागरिकांनी ऊर्जा बचतीचा प्रयत्न करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रपरिषदेत केले.
याप्रसंगी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता शेख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले- मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत असून मुंबईत भारनियमन होणार नाही. तसेच महानगरांमध्येही भारनियमन होणार नाही. टाटा पॉवरकडून सध्या ८५० मेगावॉट, जलविद्युतद्वारे ४१० मेगावॉट, डहाणूकडून २४० मेगावॉट, व्हीआयपीएल ३१० मेगावॉट, लघुकालिन निविदा व एक्स्चेंजच्या माध्यमातून १५३० मेगावॉट वीज मिळत आहे. महानिर्मितीकडून औष्णिक व वायू प्रकल्पातून ४९८० मेगावॉट, कोयना जलविद्युत प्रक़ल्पातून २३६० मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून ४१०० मेगावॉट वीज मिळत आहे.
खाजगी वीज प्रकल्प अदानीकडून १७५० मेगावॉट, रतन इंडियाकडून ३८० मेगावॉट, सीजीपीएलकडून ५६० मेगावॉट व सौर, पवनऊर्जा, एमको, जिंदाल यांच्याकडून २०० मेगावॉट वीज मिळत आहे. सध्या अंदाजे २००० मेगावॉटची तूट निर्माण झाली आहे. तूर्तास पवनऊर्जा, अणुऊर्जा व जलविद्युत प्रकल्प बंद आहेत. त्यामुळेच वीज तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. ही स्थिती १५ दिवसात सुधारणार आहे. त्यामुळे सध्याचे भारनियमन हे तात्पुरत्या स्वरूपातील आहे. विजेची मागणी असताना विजेचा तुटवडा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आपण आपल्या राज्याची मागणी पूर्ण करून उत्तरप्रदेशला वीज दिली आहे. तसेच ३० मार्च २०१७ ला सुमारे २४ हजार मेगावॉट विजेचे यशस्वी वितरण आणि पारेषण आपण केले आहे, याकडेही ऊर्जामंत्र्यांनी लक्ष वेधले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी