Latestnews

फवारणीतून विषबाधा, मृतांच्या कुटुंबियांना द्या दहा लाख- धनंजय मुंडे

2017-10-08 20:23:39 1628 Views 0 Comments

शेतकर्‍यांच्या मृत्यूला चिनी बनावटीचे पंप जबाबदार, अनेकांची शंका
यवतमाळ: शेतीत किटकनाशक औषध फवारताना झालेल्या विषबाधेतून २० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. किमान २५ जण उपचार घेत आहेत. या मृत्यूप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज मुंडे यांनी यवतमाळला भेट दिली, मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री विदर्भातले असूनही ते शेतकर्‍यांचे दु:ख का जाणून घेत नाहीत असा प्रश्न त्यांनी केला. किटकनाशके फवारताना झालेल्या विषबाधेने २० शेतकरी दगावले. त्यांना सरकारने दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. ती अपुरी असून दहा लाखांची मदत द्यायला हवी, जखमींना प्रत्येकी दोन लाख मिळायला हवेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीने प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली. ज्यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे त्यांचा उपचाराची काळजी राष्ट्रवादी घेणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान ज्या शेतकर्‍यांचा मत्यू झाला त्यांनी चिनी बनावटीची फवारणी यंत्रे वापरली होती. हे फवारताना दूरवर तुषार उडतात, हे औषध बराच काळ हवेत टिकून राहतात, त्यामुळेच हा धोका झाला. चिनी पंप मोटारीवर चालतात. त्यासाठी ताकद वापरावी लागत नाही पण देशी फवारणी पंप हाताने चालवावे लागतात, त्याचे तुषार दूरवर जात नाहीत, हवेत हे विषारी औषध पसरत नाही. त्यामुळे देशी पंपच वापरावेत असाही विचार पुढे आला आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी