Latestnews

या महिलेला करायचंय मोदींसोबत लग्न, महिनाभरापासून करतेय धरणे आंदोलन!

2017-10-08 21:17:55 2876 Views 0 Comments

नवी दिल्ली: नाव ओम शांती शर्मा, वय ४०, राहणार राजस्थानच्या जयपूरची. तिचे पती नाहीत. मोदीही एकटेच आहेत. मोदींना खूप काम असतं. मला त्यांना मदत करायची आहे, त्यांच्यासोबत लग्न करुन त्यांना साथ द्यायची आहे. यासाठी मोदींना मी पन्नास कोटी देईन, एवढंच नव्हे तर माझ्या मुलीचं लग्न राहूल गांधींसोबत लावायचं आहे. राहुलनाही मी पन्नास कोटी रुपये देईन....ओम शांती! शर्माबाई या मागणीसाठी जंतर मंतरवर महिनाभरापासून धरणे आंदोलन करीत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल इंडियात अजून ही बाब मोदींपर्यंत गेलेली नसावी. शांतीबाईंचं डोकं शांतच आहे. त्यांना कसलाही मानसिक आजार नाही. मोदींच्या कामात शेअरींग करायचंय, ते एकटेच आहेत असं त्या वारंवार सांगतात. या धरणे काळात शर्माबाई जंतरमंतराच्या जनतेसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करतात, गुरुद्वारा आणि मंदिरातून जे मिळेल त्यावर गुजराण करतात.
आपण अनेकदा आपला लग्नाचा प्रस्ताव मोदींकडे पाठवण्याचा प्रयत्न केला पण तो पोचू दिला जात नाही, मला मोदींना भेटू दिले जात नाही असं भरपूर जमीन आणि संपत्ती असलेल्या शर्माबाई सांगतात. माझंही लग्न झालं होतं. ते फार काळ टिकलं नाही. नंतर मला लग्नाच्या अनेक मागण्या आल्या पण मी त्या नाकारल्या, आता मला मोदींशीच लग्न करायचं आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी