Latestnews

महत्वाच्या घडामोडी....ग्रामपंचायत मतमोजणी अन राडा सुरु, राम रहीमची कंबर एवढी का दुखते? कॉंग्रेसमध्ये आई किंवा मुलगाच अध्यक्ष, पार्श्वनाथाच्या मंदिरावर कोसळली वीज, एसटीचे प्रवासी घटले, व्याज दर घटणार....०९ ऑक्टोबर २०१७

09-10-2017 : 07:03:26 3160 Views 0 Comments

* थेट सरपंच निवडीचा भाजपाला फायदा, एक हजाराहून अधिक ठिकाणी भाजपाचे सरपंच
* लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पूर्ण, अद्याप अधिकृत घोषणा नाही
* नांदेडमध्ये शिवसेना भाजपाला पराभूत करण्यासाठी लढत आहे, कॉंग्रेसच्या इशार्‍यावर नाचत आहे, मुख्यमंत्र्यांचा आरोप
* नांदेडमध्ये चव्हाणांचं पिढीजात सत्ता असताना हजारो लोक बेघर का आहेत? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न
* नांदेडमध्ये मुख्यमंत्र्याच्या सभेत शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी
* माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेना प्रवेश
* नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस
* जयदत्त क्षिरसागरांच्या नवगण राजुरीमध्ये पुतण्याचे पॅनल विजय, राज्याच्या राजकारणात आणखी एक पुतण्या मोठा होऊ लागला
* चापोली येथे विजेचा धक्का लागून चार जनावरांचा मृत्यू
* लातुरच्या बोगस तुकड्यांप्रकरणी शिक्षकांना आरोपी केले जाणार नाही
* लातुरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूह रचना, मतमोजणीला वेग
* १३ ऑक्टोबरला पेट्रोल पंप चालकांचा देशव्यापी बंद, लातूर जिल्ह्यातील १३५ पंप बंद राहणार
* लातुरच्या बाजारात, दिवे, कंदील, मेणबत्त्या आणि इमर्जन्सी लाईटच्या विक्रीत वाढ
* सर्वसामान्यांना नोटाबंदीचा त्रास झालाच. मात्र, श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यांमुळे ते खूश होते- नितीन गडकरी
* मुंबई : बुचर आयलंड आग- टाकी वितळून खाली बसली, आग पूर्ण आटोक्यात, स्फोट होण्याची भीती नाही
* आज १६ जिल्ह्यातील ३३३१ ग्रामपंचायतींचा निकाल
* आमच्या पक्षात आई किंवा मुलगाच पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो- मणिशंकर अय्यर
* डिझेल वाढीविरोधात आज आणि उद्या वाहतूकदारांचा देशव्यापी संप
* राज ठाकरे यांचं नवं व्यंगचित्र, टार्गेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह
* विरारमध्ये पार्श्वनाथाच्या मंदिरावर कोसळली वीज
* अण्णा हजारे जनलोकपाल विधेयकासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करणार
* अलिकडे हिंदी चित्रपटांना वाईट दिवस आले आहेत- आमीरखान
* मुंबईतीले रेल्वेस्थानकावरील वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाल्यांचा कायदा लावू नका, संघटनेची मागणी
* अमित शहांचे चिरंजीव जय यांच्या कंपनीला झालेल्या फायद्यावरुन गोंधळ, कॉंग्रेस आक्रमक
* ७५ वा वाढदिवस आणि दिवाळीही साजरा करणार नाहीत अमिताभ बच्चन
* राज्यघटनेत ‘सोशॅलिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ शब्द हवेत कशाला? मोहन भागवतांचा सवाल
* भाजपा सरकारला सत्तेची घमेंड, केली जनतेची फसवणूक- अण्णा हजारे
* निर्यातदारांना येत्या नोव्हेंबरअखेर वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) थकीत परतावा मिळेल, येत्या ०६ महिन्यांत निर्यातीवर कोणताही कर लागू केला जाणार नाही
* बिग बॉसच्‍या घरात दाऊदचा नातेवाईक जुबेरचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न
* राम रहीमला भेटण्याची हनीप्रीतची इच्छा, म्हणे पप्पांची कंबर दुखत असेल!
* राम रहीमची कंबर का दुखते, त्यांच्या कंबरेला एवढे कोणते काम होते? जाणकारांचा सवाल
* हनीप्रीतने चौकशी दरम्यान मागितला चहा आणि डोकेदुखीवर मात करणारी गोळी
* अधिकार्‍यांच्या घरी काम करणार्‍या रेल्वेच्या कर्मचार्‍यांना रेल्वेच्या कामावर परतण्याची तंबी
* मोफत वीज देण्याचे गाजर दाखवत सरकारने लोडशेडींग माथी मारले- उद्धव ठाकरे
* विषबाधेने मरण पावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना दोन लाखांपैकी अद्याप रुपयाही मिळाला नाही
* पाच वर्षात कमी झाले एसटीचे साडेसतरा कोटी प्रवासी
* राणेंना कॉंग्रेसला सडवले, आता भाजपा कुजवेल- सुभाष देसाई
* राज्यातील भारनियमनाचा निषेध, उस्मानाबादेत राष्ट्रवादीने केले कंदील आणि मेणबत्त्या घेऊन आंदोलन
* कर्जदारांच्या व्याजदरात लवकरच होणार घट
* नोटाबंदीच्या काळात केलेल्या ओव्हरटाईम कामाचा मोबदला द्या, बॅंक कर्मचार्‍यांची मागणी
* पुण्याच्या चितळे कंपनीतील कामगारांचे पगारवाढीसाठी आंदोलन, अनेकांना काढून टाकले

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी