Latestnews

चिनी आकाश दिवे, पणत्या आऊट, फटाके बाजारात ४५ परवाने, फटाक्यांवर बंदी शक्य....औरंगाबाद आठवा, पेट्रोल दर कपातीत गुजरात पहिले, एव्हरग्रीन रेखाचा वाढदिवस.......१० ऑक्टोबर २०१७

10-10-2017 : 03:25:46 2529 Views 0 Comments

* चिनी आकाश कंदील, चिनी दिव्यांवर लातुरात बहिष्कार, दुकानदारांचाही विक्रीस विरोध, लोकंतूनही भारतीय वस्तूंची मागणी
* लातूर फटाके बाजार अर्धा रिकामा, ४५ जणांना मिळाले परवाने
* दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यता
* प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री तावडे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विद्यार्थ्यांना दिली शपथ
* लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी ४२ पैकी २८ महिला
* लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नाकारले प्रस्थापितांना
* लातुरचे विधीज्ञ नारायणराव पाटील यांचे निधन, आज न्यायालयीन कामकाज बंद ठेऊन वाहणार आदरांजली
* लातुरचे शेती, पर्यावरणतज्ञ जयंत वैद्य गुरुजी यांचा आज स्मृतीदिन
* अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार, अल्पवयीन मुलगी बाळंत, कालू खलील शेख या आरोपीला पोलिस कोठडी
* खुंटेफळ येथील शेतकरी विष्णू सुरवसे यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
* विविध मागण्यांसाठी उद्या ११ तारखेला महाराष्ट्र विकास आघाडीचा लातूर मनपावर मोर्चा
* भोकर तालुक्यातील एमआयएमच्या अनेक सदस्यांनी केला एमआयएम अली पक्षात प्रवेश
* वोडाफोन आपल्या पोस्टपेड ग्राहकांना देणार ६० जीबी डेटा फ्री
* गुजरातेत पेट्रोल २.२९ तर डिझेल २.७२ रुपयांनी स्वस्त, केंद्र सरकारच्या आवाहनानंतर अमलबजावणी करणारे पहिले राज्य
* महाराष्ट्रातही मंगळवारपासून पेट्रोल दोन रुपयांनी तर डिझेल एक रुपयांनी होणार स्वस्त
* हनीप्रीत डोकेदुखी आणि रक्तदाबाने आजारी, आज संपणार पोलिस कोठडी
* कालच्या निवडणुकीत राज्यात निवडून आले सर्वाधिक सरपंच भाजपाचे, कॉंग्रेस दोन तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर
* ग्रामीण महाराष्ट्राने दिली विकासाला साथ, ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
* कॅलिफोर्नियात सात हजार हेक्टरवरील जंगल जळून खाक, मराठी कुटुंबे अडकली
* पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलातील सेक्स रॅकेट झाले उध्वस्त, दोघी ताब्यात
* पाचगणीत १३ गावांनी पाळला कडकडीत बंद, गावगुंडांच्या निषेधार्थ काढला मोर्चा
* औरंगाबादेत अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन तरुण फिरला रस्त्यावर अर्धा तास
* अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी