Latestnews

व्हाट्सअ‍ॅपवर फटाके फोडायचे का? बच्चनना वाढदिवसनिमित्त कार्टून्स, आज नांदेडात मतदान, जीएसटीमुळे सुकामेवा महागला, हनीप्रीतला कोठडी, डायलिसिससाठी अनुदान.....११ ऑक्टोबर २०१७

11-10-2017 : 07:17:41 2244 Views 0 Comments

* बैलगाडी शर्यतीवरील उच्च न्यायालयाची बंदी कायम
* १३ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेला पेट्रोल पंप चालकांचा संप मागे
* फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची निवड
* १३ ऑक्टोबर रोजी देशातील पेट्रोल पंप चालकांनी पुकारलेला संप मागे
* माझ्याच इशार्‍यावर झाली पंचकुलात दंगल, हनीप्रीतची कबुली
* अल्पवयीन पत्नीसोबत ठेवलेले संबंध बलात्कारच, वर्षभरात तक्रार करण्याची अट- सुप्रीम कोर्ट
* औंढा नागनाथ मंदिरात शिरले गटारीचे पाणी, भाविकात संताप
* राज ठाकरे भेटले मुंबई मनपाच्या आयुक्तांना, अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी
* उद्धव ठाकरे करणार आझाद मैदानावर मुंबई मेट्रोच्या कामांची पाहणी
* हजारांवर सरपंच निवडून आले, भाजपाच्या दाव्यावर कॉंग्रेसची टीका
* नांदेड मनपा निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात नऊ टक्के मतदान, कामागारमंत्री संभाजी पाटील आणि अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला
* परतीच्या पावसाने पुणे अणि बीडमध्ये केला कहर
* कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज आंतिम युक्तीवाद
* महानायक अमितभ बच्चन यांचा आज वाढदिवस, जया बच्चन वगळता सगळे बच्चन कुटुंबीय मालदीवमध्ये दाखल
* राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसनिमित्त पाठवली बच्चन यांची व्यंगचित्रं
* ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर दगडफेक
* मुंबईतील निवासी भागात फटाके विकण्यास बंदी
* सबंध महाराष्ट्रात्फटाके बंदी घालण्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा प्रयत्न
* फटाकेबंदीस खा. संजय राऊत यांचा विरोध
* फटाके व्हाट्सअ‍ॅपवर फोडायचे का? राज ठाकरे यांचा सवाल
* नांदेड महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु, तीन लाखांहून अधिक मतदार, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा सुरु
* फवारणीमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू, यवतमाळ प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी, चिनी फवारणी यंत्रांवर बंदी
* राहूल गांधी आम्ही आमच्याकडे तीन वर्षांचा इतिहास मागतात, आम्ही ७० वर्षांचा ह्शोब का मागू नये? अमित शाह यांचा प्रश्न
* आरएसएसमध्ये किती महिला आहेत? महिला सन्मानाच्या कसल्या बाता मारता? राहूल गांधी यांचा सवाल
* गुजरातेत राहूल गांधी यांनी केले आदिवासींसोबत नृत्य
* टी-२०: ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून केला पराभव, मालिकेत १-१ अशी बरोबरी
* परतीच्या पावसामुळे पुढील दोन दिवसात राज्यात पावसाच्या सरी, कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पाऊस
* निवासी भागांमध्ये फटाक्यांच्या विक्रीला मुंबई हायकोर्टाची बंदी, आदेश मोडल्यास कडक कारवाई करण्याचे कोर्टाचे निर्देश
* ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीला रवाना, जंतरमंतरवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी होणार
* पंतप्रधानच जनतेला धोका देत असतील तर देशाचे भवितव्य सुरक्षित कसे होणार; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वक्तव्य
* वकील पल्लवी पूरकायस्थ (२५) या वकील तरुणीची दोन वर्षांपूर्वी घरात घुसून हत्या करणाऱ्या सज्जाद अहमद मुघल याला अटक, मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक
* डायलिसीससाठी पुणे महापालिका देणार शहरी गरीब योजनेतंर्ग‍त शंभर टक्के अनुदान
* हरित न्यायाधिकरण शुक्रवारी घेणार समिती स्थापन्याबाबत निर्णय
* १२ टक्के जीएसटीमुळे सुका मेवा महागला, मागणीही घटली
* मनपा आयुक्त, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता व जागतिक बँक प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आंदोलन पत्र
* आमदार हरिभाऊ राठोड मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल, ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने शस्त्रक्रिया करण्यात
* रामरहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला पंचकुला कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी
* अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याच्यासह दोघांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ
* लातूर व अमरावती महापालिकांमधील स्थानिक संस्था कराचे दर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय
* नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर
* पुण्यात आरटीओ वाहन पासिंग दरम्यान टेम्पो उलटला; आरटीओ इन्स्पेक्टर व चालक किरकोळ जखमी.
* कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी मृत्यू प्रकरण: चुकीचं मिश्रण बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* औरंगाबादेत इंधन दरवाढ आणि भारनियमनविरोधात राष्ट्रवादीने क्रांतीचौकात चुलीवर पोळया भाजल्या पोळ्या
* महसूल कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन
* अहमदनगच्या रिमांड होममधील बालकाची झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या
* अंदमानमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी