Latestnews

नांदेड मनपात कॉंग्रेसचा ऐतिहासिक विजय, एमआयएम, राष्ट्रवादीचा सुपडा साफ, लातुरच्या मनपात वानर, तासभर फिरले इकडून तिकडे, पानगावात अनेकांना चावले-थोबाडे रंगवली.....१२ ऑक्टोबर २०१७

12-10-2017 : 09:53:28 2465 Views 0 Comments

* नांदेड मनपा: कॉंग्रेस ७०, भाजपा ०५, शिवसेना ०३, इतर ०३, राष्ट्रवादी अन एमआयएम ००
* भाजपाच्या परतीच्या प्रवासाला नांदेडपासून झाली सुरुवात- खा. अशोकराव चव्हाण
* संभाजीराव पाटील निलंगेकरांना नांदेडकरांनी मनावर घेतले नाही- खा. अशोकराव चव्हाण
* सोशल मिडियामुळे भाजपाला मोठा धक्का बसला- अशोकराव चव्हाण
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन २८१८, मूग ४९१० तर उडीद पोचले ४३९९
* अण्णाराव पाटील यांच्या मोर्चाच्या आधी एक तास वानराचे लातूर महापालिकेते ठाण, तासभर फिरले इकडुन तिकडे
* लातूर मनपाच्या प्रांगणात अवतरलेल्या वानराला अनेकांनी खाऊ घातले कांदे आणि चिकू
* लातुरच्या सरस्वती कॉलनीतही वानरांचा हैदोस
* लातुरच्या जुन्या औसा मार्गावर स्कूटरवरुन जाणार्‍या मानसोपचार डॉक्टरास वानराने खाली पाडले
* पानगावात ७०- ते ८० वानरांची झुंड, अनेकांना चावले, अनेकांची थोबाडे रंगवली
* जगभरातील अनेक भागांमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्राम चालण्यात अडचणी
* मला टॉर्चर केले जात आहे, मी येथे अडकले, मला सोडवा; सौदीमधील पंजाबी महिलेची जगाला याचना
* राहुल गांधी यांची काँग्रेसच्य अध्यक्षपदी निवड करा, महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत मांडला प्रस्ताव, पक्षश्रेष्ठींना करणार विनंती
* भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीने घेरले, असे जगाला वाटत नाही- अर्थमंत्री अरुण जेटली
* अभिनेता संजय दत्तने घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची जयपुरात भेट
* देवेंद्र फाडणविसांच्या मतदारसंघात मनपाच्या एका प्रभागाची पोट निवडणूक, महापौर, १०८ नगासेवक लागले कामाला!
* आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) इमारतीवरआकर्षक रोषणाई
* मुंबईत बेस्टला महाविताण पुरवणार वीज
* नांदेड महानगापालिका निवडणुकीसाठी साठ टक्के मतदान, १७ ठिकाणी बंद पडली व्हीव्हीपॅट मशीन
* किटकनाशक फवारणीने शेतकर्‍यांचा मृत्यू, मनसे कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या कृषी कार्यालयात केला राडा
* २४ ऑक्टोबरपासून राहुल गांधी गुजरात दौर्‍यावर
* किटकनाशक मृत्यू प्रकरणी संबंदित कंपन्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा, दहा हजार शेतकर्‍यांना देणार मोफत मास्क
* देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू, ०७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना मिळणार लाभ
* दिवाळीनंतर कांदा प्रचंड महागण्याची शक्यता
* आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल
* मंत्रीमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर, नारायण राणेंच्या समावेशासाठी मुहूर्त ठेवला शोधून- रावसहेब दानवे
* एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर नव्या ओव्हर ब्रीजसाठीच्या टेंडरसाठी १८ महिन्यांचा उशीर, रेल्वे मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय समिती
* घोटाळे होऊ नयेत यासाठीच नोटाबंदीचा निर्णय गुप्त ठेवला- अर्थमंत्री
* शातंतेचा अतिरेक झाला तर असंतोषाचा स्फोट होईलः फटाक्यावरील बंदीवर उद्धव ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया
* महाराष्ट्रात आणखी सात वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी, तीन होमिओपॅथी तर चार आयुर्वेदीक
* इच्छा मरणाला केंद्र सरकारचा विरोध, त्याचा गैरफायदा घेतला जाईल, आत्महत्या वाढतील, न्यायालयात स्पष्टीकरण
* श्रीनगरातील दहशतवादी हल्ल्यात धुळे येथील जवान मिलिंद किशोर खैरनार शहीद
* १७ वर्षांच्या प्रियकराला घेऊन पळून जाणार्‍या १९ वर्षीय सैराट प्रेयसीला पुणे पोलिसांनी केली अटक
* पुण्यात भर रस्त्यावर प्रेयसीच्या हात धरल्याबद्दल तरूणास सक्तमजुरीची शिक्षा
* दूध भेसळ रोखण्यासाठी धाडी टाका- खा. राजू शेट्टी
* आम्ही हिंदुत्ववादी, राज्यात फटाकेबंदी करणार नाही, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची ग्वाही
* खंडणी प्रकरणी छोटा शकील, दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर, पंकज गांगर यांच्याविरुद्ध मोक्का
* आपलं शहर चांगलं असावं असं प्रत्येकालाच वाटतं, म्हणून कुणाच्या रोजगारावर लाथ मारायची नाही: राज ठाकरे
* कोपर्डी खटल्याच्या सुनावणीला आरोपीचे वकील पुन्हा गैरहजर, पुढची सुनावणी २६ व २७ ऑक्टोबरला
* ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात
* सांगलीत मनसे कार्यकर्त्यांनी केले परप्रांतियांना मारहाण
* गुजरात विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये, मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा
* तामिळनाडूत डेंग्यूच्या आजारानं आतावर ८० जणांचा मृत्यू, राज्यात ११५०० जणांना डेंग्यूची लागण

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी