Latestnews

नांदेड मनपात कॉंग्रेसला बहुमत, भाजपचा परतीचा प्रवास सुरु- अशोकराव चव्हाण

2017-10-12 23:18:38 1722 Views 0 Comments

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी गड राखत दणदणीत बहुमत मिळवले. ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसने ७१ जाग मिळवल्या. भाजपाच्या वाट्याला पाच तर, शिवसेनेला आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. राष्ट्रवादी आणि एमआयएमला खातेही उघडता आले नाही. कॉंग्रेसमधून भाजपात गेलेला एकही उमेदवार निवडून आला नाही. कॉंग्रेसने उभे केलेले सर्व २४ मुस्लीम उमेदवार निवडून आले.
नांदेडच्या या निवडणुकीत राधेश्याम मोपलवार यांनी भाजपाला ३०० कोटी रुपयांची रसद पुरवली. भाजपची प्रचाराची जबाबदारी प्रतापराव चिखलीकर यांनी सांभाळली होती. त्यांच्यामार्फत हे पैसे पुरवले गेले असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मुख्यमंत्री स्वत: आणि जवळपास डझनभर मंत्र्यांनी नांदेड मनपा निवडणुकीसाठी सभा घेतल्या होत्या, त्याचा परिणाम झाला नाही, लोक भुलले नाहीत, आमीशांना बळी पडले नाहीत, विकासासोबत, माझ्यासोबत आणि पक्षासोबत राहिले अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेडमध्ये भाजपाने तोडफोडीचे राजकारण्केले, कॉंग्रेसचे सहा नगरसेवक फोडले पण हे सगळे पराभूत झाले असाही आरोप त्यांनी केला. मागच्या निवडणुकीत एमआयएमला चांगले यश मिळाले होते. पण या निवडणुकीत मुस्लीम समाज कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहिला असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी