LaturNews

रोटरी परिवारातर्फे मिनी मॅरेथॉन

2017-01-08 15:13:02 885 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): रोटरी फाऊंडेशनच्या शतकीय वर्षोत्सवनिमित्त शनिवार ०७ फेब्रुवारी रोजी लातूर रोटरी परिवाराच्या वतीने मिनी मॅरेथॉन व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रोटरी ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. गेल्या १११ वर्षांपासून जगभर ही संस्था आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. आज जगातल्या २०० पेक्षा जास्त देशामध्ये १३ लाख रोटरी सदस्य अविरत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
जगभरातील सर्व रोटरी क्लब, रोटरी फाऊंडेशनचे शतकिय वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. त्याच अनुषंगाने रोटरी प्रांतपाल प्रमोद पारिख यांच्रूा निर्देशानुसार ०७ जानेवारी दहा किलोमिटरची मिनी मॅरेथॉन व रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी मॅरेथॉनची हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक श्री शेख व श्री वाघमारे उपस्थित होते.
रोटरी क्लब लातूर, रोटरी क्लब लातूर सेंट्रल, रोटरी क्लब लातूर मिड टाऊन, रोटरी क्लब लातूर मेट्रो, रोटरी क्लब लातूर सिटी, रोटरी क्लब लातूर होरायझन, यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉन व रॅलीचे आयोजनात रोटरी फौंडेशनचे डिस्ट्रीक्ट डायरेक्टर डॉ. ओम मोतीपवळे, उपप्रांतपाल बस्वराज उटगे, राजेश शहा, लितेश शहा, सुधीर लातूरे, उमाकांत मद्रेवार, विनय जाजू, शिवराज लोखंडे, अनंत देशपांडे, विनोद बागडे, अ‍ॅड. सतीश दिवाण यांचा सक्रिय सहभाग होता. इनरव्हील क्लब यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बी.आर. पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन सतीश दिवाण यांनी मानले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी