LaturNews

लातूर जिल्हा परिषदेत भाजपा परिवर्तन घडवणार- पालकमंत्री

2017-01-08 18:20:39 951 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): गेल्या ३५ वर्षापासून लोकांनी काँग्रेसला लातूर जिल्हा परिषदेवर निवडून दिलं मात्र काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मालक म्हणून सत्तेचा उपभोग घेतला. आता ३५
वर्षापासून मालकांची असणारी जिल्हा परिषद बदलून जनतेच्या सेवकांची करायची आहे. त्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये निवडून जाणारा भाजपाचा प्रत्येक लोकप्रतिनीधी हा नेता म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून जाणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवेसाठी लातूर जिल्हा परिषदेत भाजपा परिवर्तन घडवणार असून भाजपाच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी लोकांनी साथ द्यावी असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एकुर्गा येथे केले.
भाजपाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचाराचा शुभारंभ लातूर तालुक्यातील एकुर्गा येथे संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे हे होते.
तर या कार्यक्रमासाठी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, भाजपानेते रमेशअप्पा कराड, प्रेदश प्रवक्ते गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य् दिलीपराव देशमुख, बाबुराव खंदाडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक केंद्रे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. उत्तराताई कलबुर्गे, जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, लातूर मार्केट कमीटीचे संचालक विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हणुमंत नागटिळक, जि.प. गटनेते रामचंद्र तिरुके, भाजपा लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, त्र्यंमबक गुट्टे, भारत चामे, सौ. ललीता कांबळे, राजकुमार कलमे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी