LaturNews

पेप्सी राजधानी अन कोक शताब्दी! बाहुबली दोनचे चित्रिकरण समाप्त, ३१ लाच मुंबईत मराठा मोर्चा, सिंग आयोगाच्या दारात, ती सध्या काय करते? बॅंकेच्या रांगेत!.....०९ जानेवारी १६

09-01-2017 : 07:03:44 784 Views 0 Comments

* विदर्भातील ११ नगरपालिकांच्या निवडणुका: ०७ भाजपा, ०२ कॉंग्रेस तर इतरांनी जिंकल्या ०२
* विदर्भातील नगरपालिका निवडणुकीत विदर्भ माझा पक्षाने उघडले खाते
* शिवस्मारक समितीचं पुनर्गठन करा, मराठा संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, विनायक मेटेंना विरोध
* लातूर आरटीओ कार्यालयासमोर ड्रायव्हिंग स्कूल चालकांची निदर्शने, विविध परवान्यांच्या शुल्कात वाढ केल्याचा निषेध
* नोटाबंदीच्या विरोधात लातूरच्या कॉंग्रेसने गांधी चौक आणि शिवाजी चौकात केले थाळीनाद आंदोलन
* नोटाबंदीला राष्ट्रवादीचाही विरोध, नंदी स्टॉप ते तहसील कार्यालय असा काढला मोर्चा
* वाहतुकीच्या दरात वाढ करा या मागणीसाठी लातूरचे कचरा वाहतूकदार संपावर, वाहने थांबवली टाऊन हॉलच्या मैदानावर
* औसा येथील अजिम विद्यालयात नवोदयच्या पेपरमध्ये खाडाखोड केली म्हणून पर्यवेक्षकास मारहाण, मुख्याध्यापक, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
* पेप्सी राजधानी अन कोक शताब्दी! लवकरच रेल्वे करणार गाड्या आणि स्टेशन्सचं नामकरण!
* डेबीट किंवा क्रेडीट कार्डवर पेट्रोल-डिझेल न देण्याचा निर्णय १३ जानेवारीपर्यंत मागे
* ३१ जानेवारी रोजीच मुंबईत मराठा मोर्चा निघणार- समन्वयक अप्पासाहेब कुढेकर
* ‘बाहुबली २’चे चित्रीकरण संपले
* भाजपच्या लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा झाला शुभारंभ
* नोटाबंदी: कॉंग्रेसी सत्तेत जे भोगावे लागले नाही ते स्वकियांच्या राजवटीत भोगावे लागत आहे- शिवसेना
* नोटाबंदी: संसदेच्या लोकलेखा समितीने २० जानेवारीला रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेलांना बोलावले चौकशीसाठी, विचारणार १० प्रश्न
* नोटाबंदीचा निर्णय कसा घेतला अन देशावर काय होतील परिणाम? लोकलेखा समिती विचारणार उर्जित पटेल यांना
* विदर्भातील नऊ नगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात, फडणवीस आणि गडकरींची प्रतिष्ठा पणाला
* विनायक मेटे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, भाजपाच्या कारभाराबाबत नाराजी
* केव्हाही होऊ शकते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा
* मुंबईत ओला-उबेर टॅक्सींच्या विरोधात काळ्या पिवळ्या टॅक्सींचा आज संप
* दाट धुक्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वाहनांचा मंदावला वेग
* जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये 'जीआरइएफ' कॅम्पजवळ दहशतवादी हल्ल्यात ०३ जण मृत्यूमुखी, हाय अलर्ट घोषित
* सपा अध्यक्ष मुलायम सिंग यादव आज घेणार निवडणूक आयोगाची भेट
* पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. मनमोहन सिंग आज सादर करणार काँग्रेसचा जाहारीनामा
* ती सध्या काय करते? तर ती सध्या ५० दिवसानंतरही बँकेच्या रागेत उभी आहे- शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखात नोटाबंदीवर टोला
* नोटाबंदीमुळे देशातील महिला झगडते आहे, भविष्याच्या चिंतेते त्यांना ग्रासले आहे- सेनेचे मत
* नोटबंदीच्या रांगेत आई, पत्नी, बहीण, आजी व नातीच्या रूपातील महिला मूक आणि बधीर होऊन रांगेत उभी- सेनेची प्रतिक्रिया
* नोटाबंदीचा फटका देशातील महिला वर्गाला बसत असल्याचा सेनेचा दावा करत, हेच महिलांचे सबलीकरण का?- सेनेचा प्रश्न
* चाकूर तालुक्यातील चापोली येथील शाळकरी मुलाचे अपहरण आणि बलात्कार प्रकणातील आरोपी महेश सोनटक्के अटकेत
* राज्यात ११ जानेवारीपासून दुधाचे दर वाढणार, शेतकऱ्यांना मिळणार ०३ रुपयांनी दरवाढ, ग्राहकांना द्यावे लागणार जास्तीचे ०२ रुपये
* जालना येथे सहलीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलीने केली आत्महत्या
* सिने दिग्दर्शक म्हणून पु.ल. आणि विजय तेंडूलकरांचे साहित्य महत्वाचे वाटते, पुलंवर सिनेमा करायला आवडेल- आशुतोष गोवारीकर
* मुंबईत महाराष्ट्र टाइम्स मिडिया पार्टनर असलेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये आशुतोष गोवारीकरांबरोबर अतुल परचुरेंनी मारल्या गप्पा
* निरीक्षण आणि मेहनतीच्या जोरावर दिग्दर्शक झालो, निरीक्षणामुळे दिग्दर्शक होण्याचा मिळाला आत्मविश्वास - आशुतोष गोवारीकर
* मतदानाच्या दरम्यान उमेदवाराच्या गाडीची काच फ़ोडणाल्याची काटोलचे भाजपा आमदार आशिष देशमुखांविरोधात तक्रार
* मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड सह १० मनापा निवडणुका फ़ेब्रुवारीत होण्याची शक्यता
* नांदगाव येथील रेल्वे स्थानकात मालवाहू गाडीच्या कोळशाच्या तीन बोग्यांना आग, अनर्थ टळला
* राज्यातील दारूबंदीसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज, बिहारमध्ये दारुबंदी होते, महाराष्ट्रात का नाही?- डॉ. प्रकाश आमटे
* पंढरपुरात येथील एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रकाश आमटे यांनी साधला पत्रकारांशी संवाद
* दुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी कायदाच माझे कृपाण- उज्वल निकम, नगर येथे निकम यांना गुरू गोविंदसिंग शौर्य पुरस्कार प्रदान
* मुंबईतील एटीटी पार्सल यार्डच्या जंगलात १२ ते १५ वर्षांच्या मुलाचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, आरोपी सापडला सीसीटीव्हीत
* राम गणेश गडकरींच्या पुतळा हटाव प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ
* सांगली जिल्ह्यातील माळवाडीत, पीडित मुलीच्या कुटुंबाची महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली भेट
* माळवाडीतील मुलीवर बलात्कार व खुनाची घटना अतिशय निंदनीय, खटला जलदगती न्यायालयात चालविणार- विजया रहाटकर
* रेल्वे मंत्रालय देणार देशातील महत्त्वाच्या फलाटांवर ०२ हजारांहून अधिक एटीएम उभारण्यासाठी जागा
* नोटाबंदीनंतरच्या ३४ दिवसांमध्ये लघु उद्योगातील रोजगारात ३५ टक्क्यांनी तर उत्पन्नात ५० टक्क्यांनी घट- अ.भा. उत्पादक संघटनेचा अहवाल
* लोकांनी जातीच्या आधारे नव्हे, तर उमेदवाराच्या क्षमतेच्या आधारावर मतदान करावे- संघाचे सहकार्यवाह कृष्ण गोपाल
* निश्चलनीकरणानंतर पैशाची गुप्तता संपुष्टात आली असून, पैसा कोणाचा हे ओळखता येणे शक्य झाले- अरुण जेटलींची फेसबुकवर पोस्ट
* निश्चलनीकरणाला लोकविरोधी म्हणणारे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचे राजकीय पुजारी- नरेंद्र मोदी भारतीय प्रवासी दिनाच्या कार्यक्रमात
* काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढयास पाठिंबा दिल्याबद्दल अनिवासी भारतीयांचे नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
* श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या मासेमारांच्या सुटकेसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी - तामिळनाडूचे मुख्यमंत्री
* क्रिकेटचा सट्टा खेळताना सोलापूर येथे ०५ जण ताब्यात
* उत्तर प्रदेशातील मिर्जापूर पोलिसांनी बिबट्याचा बछडा आणि ०५ जंगली माजरांची तस्करी करणार्‍यांना केली अटक
* परदेशात राहताना एखादी समस्या आल्यास त्याविषयी भारतीय दूतावासाला ट्विट करून त्यामध्ये मलाही टॅग करा- सुषमा स्वराज
* चीनचा कट्टर विरोधी असलेल्या व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्र, तसेच वैमानिकांना सुखोई विमानाचे प्रशिक्षण देण्याची भारताची तयारी

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी