LaturNews

शुल्कवाढीविरोधात ड्रायव्हिंग स्कूलचालकांची निदर्शने

2017-01-09 18:58:18 843 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): वाहनचालकांचा शिकाऊ परवाना, पक्का परवाना आणि परवाना नूतनीकरणाच्या दरात पाचपटीने वाढ करण्यात आल्याने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. याचा निषेध म्हणून आज लातूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ही वाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शुल्कवाढीचा परिणाम वाहनमालक, चालक, ड्रायव्हिंग स्कूलचालक आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही. २९ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाने अचानक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्याने नोटबंदीच्या काळात आरटीओ कार्यालयाच्या परिसरात गरमागरम चर्चा ऐकायला मिळत आहे. शुल्कवाढ पाचपटीने करण्यात आली. आजवर कुठल्याही शासनाने असा निर्णय घेतला नाही. हा जाचक आणि अन्यायकारक निर्णय शासनाने मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लातूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशिएशनचे अध्यक्ष खाजाभाई शेख यांनी दिला आहे. यावेळी बाबा गायकवाड, सलीम शेख, छोटू गडकरी, तुकाराम चव्हाण, नेताजी बिराजदार, कयुम शहा बर्फीवाले, संतोष पोतदार, राकेश शहा, महेश बिलोलीकर, अमान पठाण, जावेद शेख, इस्माईल शेख, वैजनाथ मिरजगावे, किशोर स्वामी, गुरु हालिंगे, शंकर इगवे, अरुण दिल्लीकर, संजय काळे, आरडी चव्हाण. साबेर काझी, वाजीद सगरे, गोपाळ काळे, एजाज शेख, शफी काझी, इंद्रजीत सोनटक्के, बालाजी भिसे, जमील शेख, दीपक डावकरे, रहीम शेख, अथर शेख, मुकेश शहा, रमेश हेंगणे, बाबूराव काळे, धनंजय बिबराळे, आमीन शेख, माजीद शेख, असलम सय्यद, रामभाऊ देबडवार, सिद्धप्पा दुधने, युनूस पटेल आदी उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी