LaturNews

नोटाबंदीविरोधात कॉंग्रेसचे दोन ठिकाणी आंदोलन, मोदींनी शिक्षा घ्यावी!

2017-01-09 19:53:16 848 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): केंद्रसरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयानंतर पन्नास दिवस झाल्यानंतरही पंतप्रधानानी म्हटल्या प्रमाणे सामान्याच्या जीवनातील अडीअडचणी कमी झाल्या नाहीत. शेतकरी, शेतमजूर तर मोठ्या आर्थिंक विवंचनेत सापडले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर नोटबंदीचा निषेध करण्यासाठी आज शिवाजी चौक आणि गांधी चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी अचानक घेतलेल्या नोटबंदी निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर, लहान व्यवसायीक तसेच सामान्य जनता यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसामान्याच्या हक्कासाठी लढत आहे. या जाचक नोटबंदीच्या विरोधातही जनतेचा आक्रोश सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर ऊतरून आंदोलन करीत आहे. आज ११ वाजता शिवाजी चौक आणि गांधी चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व्यकंट बेद्रे यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक येथे नोटबंदी विरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी एआयसीसी निरीक्षक बसवराज ए.पी., लातूर जिल्हा प्रभारी टीपी मुंडे, लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष धीरज देशमुख, आमदार त्र्यबंक भिसे, वैजनाथ शिंदे, आबासाहेब पाटील, एसआर देशमुख, सुनिता आरळीकर, संतोष देशमुख, श्रीशैल उटगे, विजय देशमुख, गोविंद बोराडे, नामदेव खेचरे, प्रताप पाटील, प्रदिप राठोड, कैलास पाटील, सहदेव मस्के, सदाशिव कदम, आनंत चौधरी, रवी काळे, विनोद सूडे, अनंत माने, शामराव सुर्यवंशी, पुनित पाटील, प्रशांत घार, संजय निलेगावकर, बादल शेख, पृथ्वीराज सिरसाट, राजेसाहेब सवई, राजकूमार आकनगिरे, जब्बार पठाण, माधव गभीरे, राजाभाऊ मोरे, सिंकदर पटेल, अनंत बारबोले, बापू शिंदे, अनिल पाटील, अनील पवार, पंडीत ढमाले, विनायक चव्हाण, ज्ञानेश्वर भिसे, गुलाब चव्हाण, कल्याण शाहीर, सुग्रीव पवार, आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सव्वाशे कोटी जनता वेठीस, मोदींनी शिक्षा घ्यावी
मोदी सरकारने नोटबंदी करुन सव्वाशे कोटी जनतेला नोटबंदीच्या माध्यमातून वेठीस धरले, नोटबंदी अपयशी झाली आहे, लोकांना माहिती देण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत, नोटबंदीमुळे देशात आणीबाणी निर्माण झाली आहे, सरकारने यावर शेतपत्रिका काढावी, पंतप्रधानांनी कबूल केल्याप्रमाणे शिक्षा घ्यावी, देशाची माफी मागावी अशी मागणी गांधी चौकातल्या आंदोलनात कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी केली. यावेळी काळ्या पैशातून शेतकर्‍यांची कर्जमाफी करा, जिल्हा बॅंक उपाशी उद्योगपती तुपाशी, भ्रष्टाचार से है यारी दिखावे की इमानदारी, मोदी की सरकार को एक धक्का मार दो, मोदी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वरी पाय, राहूल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा आशयाचे फल्क झळकावण्यात आले. यावेळी महापौर दीपक सूळ, सपना किसवे, लातूर शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख, केशरबाई महापुरे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश काळे, दगडू मिटकरी, सिकंदर पटेल आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी