LaturNews

नोटाबंदीत पंतप्रधानांनी ठरवलं १२५ कोटी लोकांना आरोपी!

10-01-2017 : 12:05:01 852 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): नोटाबंदीमुळे सबंध देशाला आरोपी ठरवलं गेलं, हेच का अच्छे दिन? असा सवाल लातुरच्या राष्ट्रवादीनं केला आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात आज राष्ट्रवादीनं नंदी स्टॉप ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदनही दिलं. नोटबंदीमुळे बाजारपेठा पडल्या बंद, आपलेच दोन हजार मिळवण्यासाठी एटीएमच्या लाईनमधे भिकार्‍यासारखे थांबावे लागते, सुटे पैसे नाहीत म्हणून व्यवसाय होत नाही असे प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष आणि मनपाचे विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अशोक गोविंदपूरकर, प्रशांत पाटील, बबन भोसले, नवनाथ आल्टे, राहूल माकणीकर, इब्राहीम सय्यद, शैलेश स्वामी, डॉ. विभाकर मोटे, संजय शेटे, राजा मनियार, पप्पू कुलकर्णी, विक्रम कदम, विनोद रणसुभे, संगीत रंदाळे, रेखा कदम, रेहाना बासले, छाया शिंदे, आशा अयाचित, इर्षाद तांबोळी, लाला सुरवसे, विशाल आवडे, कामरान खान, मदन काळे, बख्तावर बागवान, बाबा गायकवाड, अनिल गायकवाड, संजय गायकवाड, गिरीधर तेलंगे, खुद्दूस पटेल, अब्दुल सय्यद, बालाजी शिंगापुरे, इरफान शेख सहभागी झाले होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी