LaturNews

कोयनेत बदल, बहुजन समाजाचा मोर्चा, सेल्फीवर बहिष्कार, लष्करात निकृष्ट अन्न, सुरक्षा अभियानात बच्च्चन......१० जानेवारी १७

2017-01-10 13:56:47 704 Views 0 Comments

* कोयना वीज उपकेंद्रातील उच्च दाब वाहिनी बदलण्याचे काम, लातूर शहरातील दक्षिण भागातील वीज पुरवठा दुपारी साडेचार पर्यंत राहणार बंद
* औशात राष्ट्रवादीने केले धरणे आंदोलन, शेतकर्‍यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी, नोटाबंदीला विरोध
* भूमाता ब्रिगेडच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी उदगीरच्या स्वाती वट्टमवार
* लातूरच्या साई बंधार्‍याचे पाणी झपाट्याने होऊ लागले कमी, आजुबाजुच्या शिवारात ऊसाची जोरदार लावण
* निलंग्यातील सोळा शाळेच्या शिक्षकांनी सेल्फी प्रशिक्षणावर टाकला बहिष्कार
* जळकोटला तूर खरेदी केंद्राची सुरुवात
* लातूर जिल्ह्यात १४५९ क्षयरुग्णांची संख्या, रुग्णांना होणार दररोज औषध पुरवठा
* लातुरात आज निघाला बहुजन क्रांती मोर्चा, ५७ संघटनांचा पाठिंबा
* सीमेवर अनेक छावण्यात भारतीय लष्कराला मिळते निकृष्ट अन्न, बडे अधिकारी गैरव्यवहारात सहभागी, जवान तेजबहादूर यादवचा आरोप
* जवान तेजबहादूर यादवला लष्कराने ठरवलं मनोरुग्ण
* लष्कराकडे अनेकदा तक्रारी करुन थकल्यानंतर व्यथा टाकली सोशल मिडियावर- जवान तेजबहादूर यादव
* नोटाबंदीचा निर्णय संपूर्णपणे सरकारचाच होता, आरबीआयचे स्पष्टीकरण
* सात नोव्हेंबरला सूचना मिळाली अन आठ नोव्हेंबरला नोटाबंदी घोषित झाली, आरबीआयचे स्पष्टीकरण
* महापालिका निवडणुकांत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी
* मुंबईतल्या रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी झाले अमिताभ बच्चन
* भारत-इंग्लंडमध्ये आज सराव सामना
* स्टेफी ग्राफ आणि आंद्रे आगासी जोडपे पुढच्या आठवड्यात मुंबईत, विविध स्थळांना भेट देणार
* कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध पायोनियर ट्री झाला जमीनदोस्त
* पोर्तुगालचे पंतप्रधान एन्टोनियो कोस्टा उद्यापासून दोन दिवसाच्या गोवा दौऱ्यावर
* छत्तीसगडमधील नारायणपुरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत ०४ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद
* पुणे येथे एका नायजेरीयन कडून पावणे तीन लाखाचे कोकेन जप्त, गुन्हा दाखल
* लोकसंख्या वाढीबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
* सिमल्यावर सफेद बर्फाची चादर, विद्युतपुरवठा आणि वाहतुकीवर परिणाम
* जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात चकमकीमध्ये ०१ दहशतवादी ठार
* बरेलीमध्ये राष्ट्रीय महामार्ग २४ वर एका बसने पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिल्याने०६ ठार, ३० जखमी
* भविष्यात ०२ हजारच्या नोटेची छपाई थांबवा- बाबा रामदेव
* नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
* मुंबईत मानखूर्द येथे रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
* राजकारणी व सत्ताधारी मतलबासाठी लष्करास राजकीय डबक्यात ओढत असतील तर लष्कराने नोटाबंदी राजकारणापासून दूर राहवे- शिवसेना
* नोटाबंदीनंतर कश्मीर खोर्‍यातील दहशतवाद ६०-७० टक्क्यांनी घटल्याच्या लष्कराच्या माहितीवर सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा हल्लाबोल
* ‘नोटाबंदी’नंतरही व त्यात कालच्या ०३ शहीद जवानांसह शहीद झालेल्या सैनिकांचा खरा आकडा जाहीर करावा- सेनेची अग्रलेखातून मागणी
* हाच परिणाम चीनच्या दादागिरीवर आणि त्यांच्या अरुणाचल, लेह, लडाखमधील घुसखोरीवर का होऊ नये?- सेनेचा प्रश्न
* नोटाबंदी हा राष्ट्रीय कमी पण राजकीय विषय जास्त असल्याने त्या चिखलात दगड मारून लष्कराने स्वतःचे हसे करून घेऊ नये- सेनेचा सल्ला
* जळगाव येथे उत्तर महाराष्ट्रस्तरीय कुमार साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ
* पेणजवळ रामवाडी येथे कंटेनर कंटेनर उलटल्याने गोवा महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने
* जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे येथील मजुराची ८० हजाराची ऑनलाईन फसवणूक
* शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याचा भूखंड देण्यास भाजप सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी
* आवाज आणि चेहरा पोलिस खात्याला उपयोगी पडू शकत असेल तर वाहतूक पोलिसांचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर व्हायला आवडेल- अमिताभ बच्चन
* मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हे सर्व मुंबईला जगाशी जोडण्याचे प्रयत्न- भाजपचे आशिष शेलार
* बुलेट ट्रेन मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डाव असल्याची हाकाटी एका नेत्याने केली, विकास कामावर त्यांची हीच प्रतिक्रिया असते- आशिष शेलार
* राज ठाकरे यांचे नाव न घेता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला पलटवार
* विश्वनाथन आनंदपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळपटूंना घडविणा-या सांगलीत होणार जगातले पहिले बुद्धिबळ भवन
* २५ हजार चौरस फुटातील इमारतीस बुद्धिबळ पटाचे स्वरूप असणार, एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या सामन्यांची होणार व्यवस्था
* आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी ५० हेक्टरची अट शिथिल करण्याची राज्याची मागणी फ़ेटाळली केंद्राने
* पेंग्विन प्रकल्पाचं उद्घाटन उधळून लावू- नितेश राणे
* सोलापूर येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी धर्मराज काडादी, उपाध्यक्षपदी दीपक आलुरे यांची निवड
* सेना भवनवरील शिवाजी महाराजांचा पुतळा अग्रस्थानी न लावल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने उत्तर देईल - मनोज वाखरे
* दाभोलकर, पानसरेंच्या हत्येचा मास्टर माईंड मुख्यमंत्र्यांनी शोधावा, पुतळा पाडणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलीस सक्षम - संभाजी ब्रिगेड
* पुढच्या शैक्षणिक वर्षात नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथेही अकरावी प्रवेश होणार ऑनलाइन,कमाल १० कॉलेजांचा देता येणार पर्याय
* विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, विज्ञान, वाणिज्य शाखांपैकी फक्त एकाच शाखेची मागणी करता येणार
* मोटार वाहन (सुधारणा) विधेयक ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात मांडण्याचा विचार- नितीन गडकरी
* मुंबईतील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ, मात्र पघाती मृत्यूंचे प्रमाण झाले कमी- अहवालानुसार
* १९ जानेवारी रोजी मेदिनीपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यास जीवे मारण्याचे माजी कर्णधार सौरव गांगुली याला धमकीचे पत्र
* सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांना आजीव मानद अध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय 'आयओए'ने केला रद्द
* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जैरेड कशनर होणार व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार
* निवडणुकीनंतर अखिलेश यादव हेच मुख्यमंत्री, पक्षाच्या अखंडतेसाठी प्रयत्न, पक्ष फुटण्याचा प्रश्नच नाही- मुलायम सिंह यादव
* नाशिक- गुजरातच्या सीमेवर दीव दमण येथे बर्ड फ्लूची लागण झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून सीमा सील
* बंगळुरू येथे अमेरिकेच्या राज्य सहाय्यक सचिव निशा बिस्वाल यांना 'प्रवासी भारतीय सम्मान' प्रदान
* भारतात सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आली- गुजरातमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानक पूर्नविकास भूमिपूजन कार्यक्रमात नरेंद्र मोदी
* इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रवेशासाठीच्या कॅटमध्ये २० जणांना पैकीच्या पैकी गुण, राज्यातील दोनजण यशस्वी
* ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात एस. पी. त्यागींनी गंभीर गुन्हा केला, देशाची मान शरमेने खाली गेली - सीबीआयचा आरोप
* इजिप्तमध्ये इसिसने केलेल्या हल्ल्यात ०९ पोलिसांचा मृत्यू, १४ जण जखमी
* इसिसमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेला कॅनडीयन युवक ०६ महिने नजर कैदेत

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी