LaturNews

लातूर शहर उजळणार एलईडी पथदिव्‍यांनी, मनपा बदलणार १८००० दिवे

2017-01-10 21:24:00 657 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहरातील १८ हजार पथदिवे बदलले जाणार आहेत. जुन्या दिव्यांच्या जागी नवे एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. लातूर मनपाच्या विद्युत विभागात केवळ ३० कर्मचारी आहेत. अपुर्‍या संख्याबळामुळे या व्यवस्थेची देखभाल आणि दुरुस्ती नीटपणे होत नाही. त्यामुळे ठेकेदारामार्फत हे काम केले जाते. पारंपारिक पध्‍दतीचे (ट्युब, मर्क्‍युरी, सोडिअम, 2x24/4x24/CFL) कार्यरत आहेत. हे पथदिवे जुने असल्‍याने वारंवार देखभाल दुरुस्‍ती करणे क्रमप्राप्‍त झालेले आहे. वेळोवेळी देखभाल दुरुस्‍ती करूनही पथदिवे सतत बंद राहात असल्‍याने नागरिकांना उचित सुविधा उपलब्‍ध करून देता येत नाहीत तसेच शहरामध्‍ये जवळपास ३९०० खांबांवर पथदिव्‍यांची व्‍यवस्‍था नसल्‍याने त्‍या ठिकाणी पथदिवे बसवण्याबाबत वारंवार निवेदन/तक्रारी येत आहेत. साहित्‍य खरेदी देखभाल दुरूस्‍ती याशिवाय मासिक विजबिले यावर होणारा खर्च देखील लक्षात घेण्‍याजोगा आहे. हा खर्च टाळता येत नसला तरी त्‍यामध्‍ये बचत करणे हा एक पर्याय आहे. त्‍यासाठी वरिल संदर्भानुसार केंद्र शासन / महाराष्‍ट्र शासन द्वारा अत्‍याधुनिक पध्‍दतीचे विज बचतीचे एलईडी पथदिवे बसविण्यासाठी निर्देश देण्‍यात येवून पुर्तता करण्‍याचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्वसाधारणपणे ६० टक्के वीज बचत होते. यामुळे महानगरपालिकेच्‍या वतीने शहरातील सर्व पथदिव्‍यांवर एलईडी बसविण्‍यात येणार आहेत. यावर पर्यायी व्‍यवस्‍था निर्माण करण्‍याच्या हेतूने मनपाने कांही दिवसांपूर्वी मागणी प्रस्‍ताव मागविला होता. त्‍याप्रमाणे कांही संस्‍थांनी आर्थीक भागीदारी पध्‍दतीने एलईडी बसविण्‍याचा प्रस्‍ताव दिला आहे. तसेच सरळ खरेदी मार्गाने मनपास याकरीता सुमारे १५ कोटी इतका खर्च येणार आहे. लवकरच महानगरपालिकेच्‍या सर्वसाधारण सभेची मंजूरी घेवून शहरातील सुमारे १८ हजार पथदिवे बदलण्‍यात येणार आहेत. यामुळे शहर उजळून निघणार असून महानगरपालिकेची आर्थीक बचतही होणार आहे. अशी माहिती स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी