LaturNews

मनपा लावणार नवे ‘दिवे’, विनायक पाटील भाजप वाटेवर, श्रीनगर उणे २.८, ओम पुरींच्या मृत्यूचे गूढ, आज निवडणुकांची घोषणा.....११ जानेवारी १७

11-01-2017 : 07:57:25 832 Views 0 Comments

* १४ फेब्रुवारीपासून जनमत चाचण्यांवर बंदी
* १० महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, ०४ मार्च ते ०३ एप्रिल दरम्यान होणार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि अकोल्यात होणार निवडणुका
* २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार १६ आणि २१ फेब्रुवारी रोजी, लातुरचाही समावेश
* लातूर जिल्हा परिषदेसाठी होणार १६ फेब्रुवारी रोजी मतदान
* जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी पाटील भाजपात, पालकमंत्री संभाजी पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश
* जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद कॉंग्रेसमुक्त करु- पालकमंत्री संभाजी पाटील
* लातूर जिल्ह्यात शेकडोजण भाजपात येण्यास उत्सूक- पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
* नळेगावचा साखर कारखाना सुरु करा, माजी चेअरमन संभाजी पाटलांचे संभाजी पाटील निलंगेकरांना साकडे
* मनसे मुंबई मनपा निवडणुकीत सगळ्या जागा लढवणार- राज ठाकरे
* प्रसार माध्यमे भाजपच्या बाजूने अनेक वर्तमानपत्रे आणि वृत्त वाहिन्या विकल्या गेल्या- राज ठाकरे
* नोटाबंदीनंतर भाजपाकडे एवढे पैसे कुठून आले?- राज ठाकरे
* मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कुणाचाही युतीसाठी प्रस्ताव आला नाही- राज ठाकरे
* शिवरायांचा अरबी समुद्रातला पुतळा केवळ राजकीय नौटंकी- राज ठाकरे
* राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणं केवळ निवडणुकीचा स्टंट, ज्यांनी हटवला त्यांना इतिहास माहित नाही- राज ठाकरे
* १६ जानेवारीपासून ड्रायविंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार, मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून होणार सुरुवात
* शाळांतील सेल्फीचा निर्णय तुर्तास मागे
* अहमदपूरचे आमदार विनायक पाटील समर्थकांसह भाजपात जाण्याचे संकेत
* किल्लारीत घरफोड्या करणारी टोळी गजाआड, निलंगात तीन लाखांची चोरी
* वरवंटीत साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कृती आराखडा तयार करा, हरित लवादाची लातूर मनपाला सूचना
* लातूर पोलिसांनी जप्त केलेल्या ७५ सायकलींवर अधिकार सांगण्यास कुणीच पुढे येईना
* देशीकेंद्र शाळेसमोरील पुलावर एक लाख दहा हजारांचा गांजा जप्त, देवणीच्या दोघांना अटक
* लातूर महानगरपालिका बसवणार १८ हजार एलईडी पथदिवे
* लष्करातील नियोजनाविरुद्ध बंड करणारा जवान तेज बहादूर यादवची दुसर्‍या तुकडीत बदली
* काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, श्रीनगरात उणे २.८ अंश तापमान
* ओम पुरी यांच्या मृत्यूचे गूढ वाढले, दुसरी पत्नी नंदिताकडे यांच्याकडे सापडला पुरींचा मोबाईल, पोलिसांना देण्यापूर्वी केला फॉर्मॅट
* ओम पुरी यांच्या डोक्यात दिसली दीड इंचाची जखम
* प्रस्ताव आल्यास इतर पक्षाशी युती करण्यास मनसे तयार
* शिवसेनेशी युती करण्याचे भाजपाकडून संकेत
* नोटाबंदी करण्याचा निर्णय सरकारचाच, केवळ दोन दिवस आधी आम्हाला कळवले- रिझर्व बॅंक
* कॉंग्रेसशी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्या बैठकीतील सूर
* आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम होणार जाहीर
* जेजे रुग्णालयातच होणार छगन भुजबळ यांच्यावर अ‍ॅंजिओग्राफी
* आज युतीबाबत होणार भाजप-सेनेची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
* बिसमिल्ला खान यांच्या सनया त्यांच्या नातवानेच चोरल्या, उधारी फेडण्यासाठी विकूनही टाकल्या!
* मॅक्डोनाल्डमध्ये उपलब्ध होणार भारतीय पदार्थ
* दोन हजारांच्या नोटांची चित्रे असलेल्या साड्यांचे सुरतेत उत्पादन सुरु
* डानसबारमधील नृत्ये ही कला नाही, या नर्तिका प्रशिक्षित नसतात- राज्य सरकारने सांगितले सर्वोच्च न्यायालयात
* गांधी नगरमध्ये सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरातमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं भाषण
* प्रत्येक मोठा निर्णय घेताना अडचणी येतातच- नोटाबंदीवर जेटली यांचं भाष्य
* सरकारी तंत्र आणि व्यवस्थेला पारदर्शी करण्यावर भर -अरूण जेटली
* जीएसटीबाबत येत्या काही आठवड्यात काही मुद्दे निकालात निघतील- अरूण जेटली
* जम्मू - काश्मीरमधील अशांततेच्या मुद्द्यावर जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ
* नवी दिल्लीतील 'जन वेदना' संमेलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सामील
* पुण्याचा पारा घसरला ०७.७ अंश सेल्सिअसवर, मुंबईत १२.५ अंश सेल्सियस तर नाशिकमध्ये ०५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
* महाबळेश्वरचे तापमान ०५ अंश सेल्सिअस , तर वेण्णा लेक परिसरात ०२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
* हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीनंतर शीतलहरीनं पर्यटक गारठले, दिल्लीत थंडीचा कडाका
* दाट धुक्यामुळे दिल्लीत येणाऱ्या २६ रेल्वे गाड्यांना उशिर, ०७ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, तर ११ गाड्या झाल्या रद्द
* महापालिका निवडणुकीतील युती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक
* मनसेच्या दादर येथील निवडणूक वॉर रूममधून आज राज ठाकरे प्रथमच साधणार फेसबूकवर लाईव्ह संवाद
* राज्यात दहा महापालिकांसह जि. प.आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा आज घोषित होणार, आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
* मनपा निवडणुकीत युती अथवा आघाडी न करण्याची भूमिका घेणारे राज ठाकरे प्रस्ताव आल्यास युतीचा करणार विचार
* जळगावमध्ये आज निघणार बहुजन क्रांती मोर्चा
* आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संपूर्ण विदर्भात ८० ठिकाणी होणार रास्तारोको
* सोलापूर-विजापूर महामार्गावरील वडकबाळ येथे कार झाडावर आदळल्याने, ०३ जण जागीच ठार, ०१ जखमी
* गुजरातमध्ये सजला ०२ हजारांच्या गुलाबी नोटांचे डिझाईन असलेल्या साड्यांचा बाजार
* धार्मिक वक्तव्य करणं टाळा, निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना इशारा
* उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांनी केली व्हॅनमधून १८४ किलो चांदी जप्त
* राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांचे समारोपाचे भाषण
* ओबामा: व्यक्तीगत स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य ही संस्थापकांकडून मिळालेली उत्तम भेट
* ओबामा: सामान्य लोक सक्रीय होतात तेव्हाच बदल घडतो, प्रत्येक दिवस मी तुमच्याकडून शिकलो, तुम्ही मला एक चांगला राष्ट्राध्यक्ष ओअबामा:
* ओबामा: भेदभावपूर्ण वागणुकीपासून आपल्या लोकशाहीला धोका
* ओबामा: अमेरिकन मुस्लिमांविरोधात भेदभाव मान्य नाही, इसिस नष्ट होईल, जे अमेरिकेला धमकावतात ते सुरक्षित राहू शकत नाही
* ओबामा: मागच्या आठ वर्षात एकाही परदेशी दहशतवादी संघटनेला अमेरिकेवर हल्ला करता आला नाही
* ओबामा: कामाला सुरुवात केली होती त्यापेक्षा अमेरिका आज चांगल्या, सुस्थितीत आहे
* ओबामा: आपल्या देशात लोकशाहीचा एक उत्तम नमुना दिसेल, लोकांनी निवडलेला एक राष्ट्राध्यक्ष दुस-या राष्ट्राध्यक्षाच्या हाती सत्ता सोपवेल
* ओबामा: ओबामांच्या कार्यकाळासारखेच नवीन राष्ट्राध्यक्षांच्या काळातही भारत-अमेरिका संबंध दृढ राहतील - मार्क टोनर, अमेरिका स्टेट डिपार्टमेंट
* कंदहारच्या गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू, १८ जखमी
* दहशतवादाविरोधील लढाईत भारत अफगाणिस्तानबरोबर - नरेंद्र मोदी
* दुस-या महायुद्धाची बातमी सर्वप्रथम देणारे ज्येष्ठ पत्रकार क्लेअर हॉलिंगवर्थ यांचे हाँग काँग येथे निधन
* कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीच्या अखेरच्या सामन्यात भारत 'अ' संघाचा इंग्लंडकडून ०३ विकेटने पराभव

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी