LaturNews

अर्थतज्ज्ञ खा.डॉ. नरेंद्र जाधव यांचे रविवारी लातुरात व्याख्यान

2017-01-11 20:01:46 519 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार १५ जानेवारी २०१७ रोजी अर्थतज्ज्ञ खा.डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. राजस्थान विद्यालयाजवळील एसएमआर स्विमींग पूल येथे सायंकाळी ०५.३० वाजता ‘विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर खा. डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तथा विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार हे राहणार आहेत. या प्रसंगी श्रीमती गुणवंतीबेन श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक उद्योजक अजय ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, धर्मराज हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या व्याख्यानास उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती गुणवंती ठक्कर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हनमंत जगताप व संचालक मंडळाने केले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी