LaturNews

एस टी महामंडळात ०१ जानेवारीपासून प्रवासी वाढवा अभियान

2017-01-11 20:08:41 587 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): एसटीचा घटता प्रवाशी संख्येचा टक्का कमी करुन उत्पन्न वाढविण्याचा उदेशाने महाराष्ट्रातील २५० आगारांच्या पातळीवर प्रवासी अभियानाची सुरुवात होत असून, ०१ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या तीन महिन्याच्या कालावधीत चालणाऱ्या या आभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारास दरमहा ०१ लाख रुपयाचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच व्दितीय क्रमांकावरील आगारास ७५ हजार रुपयांचे व तृतीय क्रमांकावरील आगारास ५० हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. त्याच बरोबर या आभियानांतर्गत उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणाऱ्या विभागास ५० हजार रुपयांचे विशेष बक्षिस दिले जाणार आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य घेऊन गेली ७० वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीला महाराष्ट्राची लोकवाहिनी ही बिरुदावली मिळाली आहे.परंतु गेल्या चार-पाच वर्षात विविध कारणांनी एसटीचा प्रवासी एसटी पासून दुरावत असल्याचे चित्र दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटीचा प्रवासी राजदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चालक-वाहकाच्या माध्यमातून एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविण्याच्या दृष्टीने प्रवासी वाढवा विशेष अभियानाची संकल्पना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मांडली आहे. त्यासाठी एसटीच्या चालक-वाहकांना प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्याकरीता प्रत्येक आगार पातळीवर या अभियान कालावधीमध्ये सर्वाधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहकास दरमहा रोख ०५ हजार रुपयाचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच त्याला या कामगिरीमध्ये साथ देणाऱ्या चालकाला देखील रु. ०३ हजार इतके रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.या अभियानामुळे गेली चार- पाच वर्षे एसटीपासून दुरावलेला प्रवासी एसटीकडे वळण्यात सुरुवात होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केला आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी