LaturNews

स्थायी समितीच्या १६ नगरसेवकांना अपात्र करावे- भाजपा

12-01-2017 : 11:20:09 757 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): शहर विकासाचा आराखडा १९७५ साली जाहिर करण्यात आलेला होता. या आराखडयानुसार शहरातील सर्वे क्रमांक १३९ मध्ये साईट क्र. १११ व ११२ या ठिकाणी सांस्कृतिक सभागृहत व बालोउद्यान यासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात आले असून याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सदर याचिका दाखल झालेली असतानाही लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन सामान्य जनतेचे नुकसान केलेले आहे. हा ठराव शासनाने विखंडीत केलेला असून या प्रकरणी नगरसेवकांना दोषी ठेवलेले आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. या प्रकरणी मनपा आयुक्तांनी निवदेन देण्यात आलेले आहे.
शहराच्या विकासाचा आराखडा १९७५ साली जाहिर करण्यात आलेला होता. यानुसार साईट क्र. १११ व ११२ ही जागा सांस्कृतिक सभागृह व बालाउद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आलेले असून या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सदर याचिका दाखल असतानाच महानगरपालिकेच्या स्थायी समितीने स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन मनपाची सदर जागा व गाळे भाडे पट्टयाने देऊन जनतेचे नुकसान केलेले आहे. सदर ठराव मनपासह लातूरकरांच्या हिताच्या विरुध्द असल्याने शासनाने ५ जानेवारी २०१७ रोजी हा ठराव विखंडीत करुन नगरसेवकांना दोषी ठरविलेले आहे. दोषी ठरविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या या १६ नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी मनपाआयुक्तांकडे निवदेनाद्वारे शहर भाजपाने केलेले आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गांभीर्याने विचार करुन योग्य ती कारवाई करुन या १६ नगरसेवकांना अपात्र घोषित करावे असे निवेदन देण्यात आलेले आहे. सदर निवेदनावर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महानगर प्रचार प्रमुख अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, सरचिटणीस अ‍ॅड. प्रदिप मोरे, सरचिटणीस विवेक बाजपाई, शिवराज टेकाळे, मंडळ प्रमुख गुरुनाथ मगे, मोहन माने, सुधीर धुत्तेकर, प्रविण सावंत, देविदास काळे, ओम रुकमे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत. सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगरविकास विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी लातूर व मनपा आयुक्त लातूर यांना देण्यात आलेली आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी