LaturNews

कंडोमची होळी, सेतू रविवारीही सुरु, अमित शाह भेटले ठाकरेंना, स्वराज शर्यतीबाहेर, विजय भटकर चर्चेत, बाबांना शिकवायचाय पाकमध्ये योगा......१८ जून २०१७

18-06-2017 : 01:38:43 773 Views 0 Comments

* भाजपाध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्र्यांसह भेटले उद्धव ठाकरेंना, ७५ मिनिटे चालली बंद खोलीत बैठक
* विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी लातुरचे सेतू सुविधा केंद्र आजही सुरु
* उद्या लातूर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतींची निवड
* ऑक्टोबर महिन्यापासून आठवड्यातून दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचा लातूर महानगरपालिकेचा प्रयत्न
* लातूर जिल्ह्यात साडेतीन वर्षात १०४ लाचखोर सापडले, सर्वाधिक लाचखोर महसूलचे, दुसरा क्रमांक शिक्षण विभागाचा
* सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी कर हटवा विचारधारा सामाजिक संस्थेची ग्रामीण भागात आंदोलने, महिलांनी केली कंडोमची होळी
* सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी कर हटवा या मागणीसाठी लातुरच्या विचारधारा संस्थेचे मुंबईच्या आझाद मैदानावर बुधवारी उपोषण
* शिवसेनेने ‘वर्तन’ न सुधारल्यास योग्य तो निर्णय घेण्यास भाजप मोकळा- अमित शहा उद्धव ठाकरेंना इशारा देणार असल्याचे वृत्त
* राज्यात सर्वच मतदारसंघांत भाजपाची ताकद वाढविण्याचे आदेश दिले, २०१९ ची विधानसभा निवडणुक भाजपा लढेल स्वबळावर- अमित शहा
* मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झाली बैठक
* ‘गुणागोंविदाने राहा’ मुंनई मनपा नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी खडसावले
* राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा खुलासा
* आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारत विरुध्द पाकिस्तान लढत, हॉकीच्या मैदानातही रंगणार भारत-पाक सामना
* आज होणाऱ्या अंतिम लढतीत भारतीय संघाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना आणि होमहवन
* सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सिल्लोडमध्ये कडकडीत बंद
* कोचीच्या मेट्रो सेवेत २३ तृतीयपंथी आणि एक हजार महिलांना मिळाली नोकरीची संधी
* शिवसेना ही आमची मजबुरी नाही, शिवसेनेला सहन करतोय असेही नाही- अमित शाह
* पाकिस्तानात जाऊन योगा शिवकवण्याची रामदेवबाबांची इच्छा, मसूदसारखे दहशतवादी वाईट, पाकमधील लोक चांगलेच
* दहावीच्या फेरपरीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज भरले जाणार, जुलै- ऑगस्टमध्ये परीक्षा घेतल्यावर ऑक्टोबरमध्ये परीक्षा नाही
* ज्ञानोबा, तुकोबा दोन्ही पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम, आषाढीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात २५ जूनपासून २४ तास दर्शन
* आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात केला योगा
* नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
* राज्यात रिक्षांप्रमाणेच काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी ‘मागेल त्याला परवाना’ देण्याचा निर्णय
* राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्याचा विचार करणार- अमित शाह
* राष्ट्रपतीपदासाठी संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या नावाचीही चर्चा
* सातारा जिल्ह्य़ातील बोरगाव दर वर्षी शंभर टक्के शेतीचे कर्ज फेडणारे गाव
* समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ लाख ते ०१ कोटी मिळण्याची शक्यता
* पुण्याच्या बालेवाडी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाचे तत्कालीन उपसंचालक माणिक ठोसरेंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल
* बीड जिल्ह्यात नायब तहसीलदार माधव काळे ०५ लाखांचं बील काढण्यासाठी लाच घेताना अटकेत
* चंद्रपुरात दारु रेतीच्या ट्रकमधून नेल्या जात असलेल्या १० लाखांच्या दारुसह तिघांना अटक
* औरंगाबाद-पैठण भागात वादळी वाऱ्यासंह पाऊस
* १६ लाखांचे इनाम असलेल्या पवन वेलादी या नक्षलवाद्याला गडचिरोली जिल्ह्यात अटक
* तूर चोरी तपासादरम्यान जोडीदारांना पोलिसांची मारहाण पाहून मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू
* दहा हजाराच्या कर्जासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव तालुक्यात स्वाभिमानीने केली दगडांची पेरणी
* यावर्षी अतिरेकी हल्ल्यांतील शहीद १४ पोलीस आणि ०२ विशेष अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना जम्मू-काश्मीरचे पोलीस देणार एक दिवसाचे वेतन
* महाराष्ट्र व मध्यप्रदेशात प्रत्येक गावात सशस्त्र पथके तयार करून सत्ता स्थापन करण्याचा माओवाद्यांचा शेतकऱ्यांना आवाहन
* हैदराबाद-दिल्ली विमानामध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला दिल्ली विमानतळावर अटक
* अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची पोर्तुगालला परत नेण्यासाठी युरोपियन कोर्टात धाव
* आयसीसीची वार्षिक परिषद १९ जून रोजी लंडनमध्ये होणार
* लंडन आग दुर्घटनेतील ५८ बेपत्ता लोक मृत घोषित

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी