LaturNews

सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त करा; आझाद मैदानावर उपोषण, कंडोमची होळी

18-06-2017 : 01:21:40 674 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): कुंकू, बांगड्या आणि कंडोम करमुक्त पण सॅनिटरी नॅपकीनवर १२ टक्के जीएसटी कर! एकीकडे स्वच्छ भारतसाठी सरकार अनुदान देतं पण दुसरीकडे महिलांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक सॅनिटरी नॅपकीनवर मात्र कर लावला जातो याचा निषेध करीत विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून आंदोलने सुरु आहेत. लामजना, तळणी तांडा, शिरस्ल, अनसरवाडा आदी अनेक गावातून महिलांनी निदर्शने केली. तळणी तांडा येथे महिलांनी कंडोमची होळी केली. यासंदर्भात ग्रामीण विकास मंत्री, आरोग्यमंत्र्यांना निवेदनेही पाठवली. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बुधवार २१ जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणही केले जाणार आहे असे या संस्थेच्या प्रमुख छाया काकडे यांनी सांगितले. आजवर २५ गावातील महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून दीड नागरिकांनी सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करण्याचा आग्रह धरला आहे. सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करा, कर्करोगग्रस्त महिलांना सॅनिटरी नॅपकीन आणि आरोग्याच्या सेवा मोफत द्या, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयातून व्हेंडींग आणि डिस्पोजल मशीन्स बसवणे बंधनकारक करा, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकीन युनिट महिला बचत गटांना चालवायला द्या, रेशनवरही हे नॅपकीन्स उपलब्ध करुन द्या अशा मागण्या या महिलांनी केल्या आहेत.
(छाया काकडे 9421504813)

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी