LaturNews

रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, अशोक गोविंदपूरकर स्थायीचे सभापती, खाजगी कृषी महाविद्यालये अडचणीत, राहुल गांधींना मोदींच्या शुभेच्छा.....१९ जून २०१७

19-06-2017 : 07:53:46 1124 Views 0 Comments

* राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी शिवसेना नेत्यांची बैठक
* हे हिंदूराष्ट्र आहे हे दाखविण्यासाठी मोहन भागवतांची उमेदवारी आवश्यक होती- उद्धव ठाकरे
* दलित समाजाला आपलंसं करण्यासाठी दलित राष्ट्रपती करणे मान्य नाही- उद्धव ठाकरे
* देशाच्या भल्यासाठी स्वामीनाथन यांचं नाव सुचवलं होतं- उद्धव ठाकरे
* गाय आणि म्हशीच्या दुधाच्या भावात झाली वाढ, गायीचे २७ तर म्हशीचे दूध झाले ३६ रुपये प्रति लिटर
* गणित हा पर्यायी विषय होऊ शकतो का? मुंबई न्यायालयाचा शिक्षण मंडळाला प्रश्न
* कला शिक्षण घेणार्‍यांसाठी गणित विषयाचा काय उपयोग, उच्च न्यायालयाचा सवाल
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु स्वामी आत्मस्थानंद यांचे कोलकात्यात निधन
* बिहारचे राज्यपाल, उत्तरप्रदेशचे निवासी रामनाथ कोविंद भाजपाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार
* जेट विमान प्रवासात महिला झाली प्रसूत, बाळाला जेटकडून आयुष्यभरासाठी मोफत प्रवासाची सुविधा
* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन २७७५, हरभरा ५००० तर तूर पोचली ३८०३ रुपयांवर
* लातूर जिल्ह्यात आजवर पडला १८६.७९ मिलीमीटर पाऊस
* लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी कॉंग्रेसचे अशोक गोविंदपूरकर यांची निवड, भाजपच्या नितीन वाघमारेंचा पराभव
* आज पेट्रोल, डिझेल कालच्या पेक्षा स्वस्त, लातुरात पेट्रोल रु. ७५.२४, डिझेल रु. ५८.९९ प्रति लिटर
* राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरण्याआधीच अमित शाह यांनी मागितला शिवसेनेचा पाठिंबा
* राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
* माझ्यानंतर भाजपाध्यक्ष कोण होणार माहित नाही, पण सोनिया गांधींनंतर? राहूल गांधी, कॉंग्रेस कुटुंबाचा पक्ष- अमित शाह
* नदीजोड कार्यक्रमाला अभिनेता रजनीकांत यांचा पाठिंबा, पंतप्रधानांना भेटणार
* हॉकी वर्ल्ड लीगच्या सामन्यात भारताने केला पाकिस्तानचा पराभव
* राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करणार- मुख्यमंत्री
* कर्जमाफीच्या निकषांवर आज शेतकरी नेते आणि सरकारची बैठक, वादळी होण्याची चिन्हे
* जीएसटी ०१ जुलैपासूनच, दोन महिने आयटी रिटर्नसाठी मात्र सवलत
* पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना गमावल्यानंतर अनेक ठिकाणी टीव्ही संचांची तोडफोड, भारतीय खेळाडूंचे पोस्टर्सही जाळले
* ०९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा
* मुंबईच्या आधी नागपूर होणार स्मार्ट सिटी
* मत्स्यव्यवसाय विभागाने सुचविलेल्या २१ योजनांना केंद्र सरकारची मंजुरी
* ठाण्यात दोन महिलांसह चार बांगलादेशींना अटक, आधारकार्ड आणि पॅनकार्डही जप्त
* १४९ पोस्ट ऑफीस पासपोर्ट केंद्रांची सरकारकडून घोषणा
* नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या एका सभेत एका नेत्याने राहूल गांधी यांना म्हटले शहीद! व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल
* नाशिक जेलरोडच्या गणपती मंदिरात प्रदक्षिणा घालताना सुभाष डोईफोडे यांनी केली आत्महत्या
* लातुरातील बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेज प्रकरणातील दोघा आरोपींना हैदराबादमधून घेतले ताब्यात
* लातूर येथील श्यामनगर परिसरात संजय केरबावालेच्या घरातील बनावट कॉल सेंटरवर एटीएसची धाड़
* औराद शहाजानी परिसरातून वाहणा-या तेरणा नदीवरील तीन उच्चस्तरीय बंधार्‍याचे उघडले दरवाजे
* दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार
* आयटीआयची केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू
* राष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भात आज दिल्लीत भाजप संसदीय मंडळाची बैठक
* पानसरे हत्येतील मुख्य संशयित समीर गायकवाडची आज कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सुटका
* भारतीयांचा खूप कमी पैसा स्विस बँकांमध्ये, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील नागरिकांचा पैसा जास्त- स्वित्झर्लंड खाजगी बँकर्स समूह
* ‘जीएसटी’शी संबंधित तब्बल २५० अ‍ॅप्स उपलब्ध, गुगल व मायक्रोसॉफ्ट कंपन्यांनीचीही गुंतवणूक
* राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
* राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातल्या मंडलगड येथे १० मोरांची हत्या
* गोमती नदी प्रकल्प घोटाळाप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले सीबीआय चौकशीचे आदेश
* दार्जिलिंग हिमालयन रेल्वे सेवेवर गोरखा जनमुक्ती मोर्चामुळे परिणाम
* राजस्थानमधील भरतपूरच्या भुसावर येथे बाणगंगा नदीकिनारी प्राचीन नाणी आढळली १९०४ ते १९१९ या कालखंडातली नाणी
* माळशिरस पोलिसांनी पकडले ५० किलो चंदनसह ०४ लाखांचा मुद्देमाल
* राज्यातील २० खाजगी कृषी महाविद्यालयाचा दर्जा घसरल्याने आवश्यक निकषांची पूर्तता न झाल्यास होणार बंदची कारवाई
* माळशिरस तालुक्यात पल्स कंपनीचे व्यवहार थांबल्याने गुंतवणूकदारांच्या त्रासाला कंटाळून एजंटची आत्महत्या
* बिहारमध्ये लखिसराईमधील किऊल रेल्वेस्थानकाजवळ ट्रेनमध्ये मुलीवर बलात्कार करून फ़ेकले ट्रेनमधून
* स्वामीनाथन आयोगावर चर्चा व्हावी, गोहत्या बंदी कायदा आणावा, गोरक्षेला विरोध करणारे देशद्रोह्यांचे सहकारीच- विहिपचे सुरेश जैन
* विलेपार्ले येथे एक संगीत लायब्ररी उभी करण्याचे पु. ल. देशपांडे यांचे स्वप्न त्यांचे पुतणे जयंत देशपांडे यांच्या पुढाकारातून होणार साकार
* राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांसाठी देण्यात येणार वेगवेगळ्या रंगातील मतपत्रिका
* भारतात मुली पालकांसाठी सर्रास आपल्या प्रेमाचा त्याग करतात- सर्वोच्च न्यायालय
* टीसीएस, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, इन्फोसिस व ओएनजीसी या कंपन्यांचे घसरले बाजार भांडवल
* अकोला येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड, ०३ मोबाइल, एक टीव्ही, ३३ हजाराचा मुद्देमालासह एकाला अटक

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी