LaturNews

भरती प्रक्रिया संस्थाचालकांकडून काढून घेण्याविरुद्ध न्यायायलयात जाणार

2017-06-19 16:19:06 393 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): राज्य सरकारने १२ जून रोजी परिपत्रक काढून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची भरतीची प्रक्रिया संस्था चालकांकडून काढून घेण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारच्या या जाचक निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील जयक्रांती महाविद्यालयात लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालकांची बैठक कार्याध्यक्ष डीबी लोहारे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस किशनराव नाडे, संस्थाचालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार, संघटनेचे सचिव प्राचार्य बाबूराव जाधव, कोषाध्यक्ष प्राचार्य डीएन केंद्रे, प्रा. गोविंद घार, जेजी सगरे, मधुकर पात्रे, अ‍ॅड. आर्य आदिंची प्रमुख उपस्थिती होती. राज्य सरकारने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचे संस्थाचालकांचे अधिकार काढून घेण्याच्या प्रक्रियेस सुरूवात केली आहे. या निर्णयास बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला. तसेच या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. २४ जून २०१७ रोजी नाशिक येथे राज्य कार्यकारिणीची बैठक विजय नवल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यानुसार राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रामदास पवार यांनी दिली. या बैठकीतील चर्चेत अ‍ॅड. वसंतराव भोईबार, अ‍ॅड. सुपोषपानी आर्य, प्रा. पी.टी. पवार, किशनराव नाडे, प्राचार्य केंद्रे, प्रा. घार, कमलाकर शिंदे, वाघमारे आदिंनी भाग घेतला. अध्यक्षीय मनोगतात लोहारे यांनी शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वांनी संघटीतपणे लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी