LaturNews

यशवंतराव ग्रामीण रुग्णालयात योग दिनाचे आयोजन

2017-06-19 17:45:09 231 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, पतंजली योग समिती व आयुष यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २१ जून रोजी सकाळी ०९ वाजता येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पतंजली योग समितीचे व्यंकट मुंडे व आयुषच्या योगशिक्षीका श्रीमती रमसाने या उपस्थितांना योगदिनाविषयी मार्गदर्शन करुन योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यक्रमास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेश कराड, प्राचार्य डॉ. सरिता मंत्री, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, डॉ. बी. डी. आडगावकर, रुग्णालय अधिक्षक डॉ. आंगद चाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय, नर्सींग महाविद्यालय, मांजरा चॅरीटेबल ट्रस्टचे कै. बबरुवान विठ्ठलराव काळे आयुर्वेदिक महाविद्यालय, वसंतराव काळे होमीओपॅथी महाविद्यालय व महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सींग या महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. योग दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमास लातूर येथील वैद्यकीय, दंत, फिजीओथेरपी व नर्सींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक व नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सरिता मंत्री यांनी केले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी