LaturNews

गोविंदपुरकरांचा अनुभव विकास प्रक्रियेत उपयुक्त- आ. अमित देशमुख

2017-06-19 19:35:58 1626 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याबद्दल अशोक गोविंदपूरकर यांचे आमदार अमित देशमुख यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या जेष्ठत्वाचा आणि प्रदिर्घ अनुभवाचा लातूरच्या विकास प्रक्रियेत उपयोग होईल असे म्हटले आहे. स्थायी समिती सभापती निवडीच्या निमित्ताने प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पुढे म्हटले की, स्थायी समितीचे नवनिर्वाचीत सभापती अशोक गोविंदपूरकर आणि विरोधी पक्ष नेते दीपक सूळ आपल्या सहकार्‍यांच्या सोबतीने काँग्रेस पक्षाची विकास प्रक्रिया निश्चितपणाने पुढे नेतील अशी अपेक्षा आहे. लातूर शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने विकासाचा आराखाडा तयार करुन ज्या विकास योजना मंजूर करून ठेवल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूरच्या महापौरांनी स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते यांना विश्वासात घेऊन काँग्रेसने यापुर्वी नियोजित केलेला विकास आराखडा राबवण्याच्या कामी एकत्रित काम करण्याचे ठरवले तर त्याचा आनंदच होईल असे सांगून, समन्वयाच्या भुमिकेतून काम झाले तर शहराच्या विकास प्रक्रियेला गतीच मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी लातूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही आमदार देशमुख यांनी अभिनंदन केले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी