LaturNews

राष्ट्रपती अर्जाच्या सूचक, अनुमोदकासाठी खा. गायकवाड यांची निवड

2017-06-19 19:45:42 396 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): होवू घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीकडून जाहीर झालेल्या रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणार्‍या सूचक-अनुमोदकासाठी खा. डॉ. सुनील गायकवाड यांची निवड पक्षाने केली आहे. यासाठी देशातून केवळ ५० खासदारांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. गायकवाड यांचे नाव आहे.
लवकरच राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आघाडीच्या वतीने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आजच केली आहे. कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक किंवा अनुमोदक अशी स्वाक्षरी करण्यासाठी भाजपने खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची निवड केली आहे. डॉ. गायकवाड हे उद्या (मंगळवारी) दिल्ली येथे जावून कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणार आहेत. देशातील केवळ ५० खासदार या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून डॉ. सुनील गायकवाड यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल पक्षातून त्यांचे स्वागत होत आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी