LaturNews

पालकसचिवांनी घेतला स्वच्छता अभियान व अमृत योजनेचा आढावा

2017-06-19 19:50:58 404 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर जिल्ह्याच्या नागरी क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान व लातूर महापालिका तसेच उदगीर नगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अमृत योजनेचा सविस्तर आढावा नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा लातूर जिल्हा पालक सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांनी घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सजग राहून काम करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालक सचिव म्हैसकर बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा प्रशासन अधिकारी (न.पा.) सतिश शिवणे, महानगरपालिकेचे उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस, अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, निलंगा नगरपरिषदेचे गणेश चव्हाण, औसा नगरपरिषदेचे मल्लीकार्जुन पाटील, रेणापूर नगरपंचायचे मुख्याधिकारी किरण सुकलवाड, चाकूर नगरपंचायतीचे सुमीत जाधव, शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे अजिंक्य रणदीवे, देवणी नगरपंचायतीच्या मनिषा वडेपल्ली उपस्थित होते.
नागरी क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून लातूर जिल्ह्यात सर्व स्थानिक नागरी संस्थेने शहरे हगणदारीमुक्त करण्यासाठी मिशन मोड पध्दतीने कार्यवाही सुरु केल्यामुळे जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा ह्या हगणदारीमुक्त झाल्याबद्दल पालक सचिव म्हैसकर यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. तसेच नगर परिषदेने QCI तपासणीसाठी आवश्यक ती सर्व करण्याचे निर्देश दिले जिल्ह्यातील देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर या नगरपंचायतीना जुन-२०१७ अखेर तर जळकोट व रेणापूर नगरपंचायती दिनांक १५ जुलै २०१७ पर्यंत हगणदारी मुक्त करण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमानपणे काम करण्याचे निर्देश श्रीमती म्हैसकर यांनी दिले. तसेच लातूर शहर महापालीकेनेही जून-२०१७ अखेरपर्यंत लातूर शहर पुर्णपणे हगणदारी मुक्त करण्याची कार्यवाही करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी