LaturNews

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ आरोग्यावर व्याख्यान

2017-08-10 18:23:55 164 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पाचव्या प्रेरणादिनानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील प्रसिध्द आयुर्वेद तज्ञ डॉ. परीक्षित शेवडे हे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मनोरंजनातून आरोग्याकडे कसे जायचे, आपली प्रकृती कशी ओळखायची, प्रकृतीनुसार स्वत:ची काय काळजी घ्यावी, प्रकृतीनुसार आहार कसा असावा अशा पध्दतीने हसत खेळत आरोग्यसंदेश देणारा व विविध पैलूंनी नटलेल्या या आरोग्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. परिक्षित शेवडे हे विविध नामवंत नियतकालिके व वर्तमानपत्रांतून स्तंभ लेखन व प्रासंगिक लेखन करतात. त्यांची वकॄत्व तंत्र व मंत्र, घरोघरी आयुर्वेद, गोमाता आणि मानवता आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शनच्या कार्यक्रमातून आयुर्वेद व आरोग्यविषयक जनजागृती यावर मार्गदर्शन करीत असतात. समाज जागृतीकरिता भारतीय क्रांतीकारक व थोर पुरुषांची चरित्रे लोकांपर्यंत पोह्चविण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. हे व्याख्यान रविवार १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ०५ वाजता दयानंद महाविद्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे होणार आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ. अशोक आरदवाड, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. पवन लड्डा यांनी केले आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी